HDFC च्या शेअरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचं नुकसान, स्टॉक का गडगडला? तज्ज्ञांनी काय म्हटलं?

HDFC Bank Share : एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण दिसून आली आहे. बँकेचा शेअर 950.25 रुपयांवर बंद झाला.

Continues below advertisement

एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये घसरण

Continues below advertisement
1/7
एचडीएफसी बँकेच्या स्टॉकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. आज बँकेच्या शेअरमध्ये 1.24 टक्क्यांची घसरण झाली. म्हणजेच बँकेचा शेअर 11.95 रुपयांच्या घसरणीसह 950.25 रुपयांवर बंद झाला.
2/7
एचडीएफसी बकेनं डिसेंबरच्या तिमाहीतील कामगिरीबाबत घोषणा करत 5 जानेवारी 2025 ला एक्सचेंज फायलिंग केलं. त्यामधील माहितीनुसार 31 डिसेंबर 2025 ला त्यांचं कर्ज वार्षिक आधारावर 11.9 टक्के वाढून 28445 अब्ज रुपये झाल्याची माहिती दिली. ठेवींमध्ये देखील 12.2 टक्के वाढ झाल्याचं बँकेनं सांगितलं.
3/7
रिलायन्स ब्रोकिंगचे रिसर्च हेड अजीत मिश्रा यांच्या मते ही घसरण ठेवींमध्ये अपेक्षित वाढ न होणं आणि तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी नफा वसूल करण्यामुळं झाली आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करता विश्लेषक सकारात्मक असल्याचं दिसून येतं.
4/7
एसएमसी ग्लोबल सिक्यूरिटीजच्या वरिष्ठ संशोधन विश्लेषक सीमा श्रीवास्तव यांनी बँकेचं मजबूत संस्था आणि धोरणात्मक रणनीतीसाठी कौतूक केलं आहे.
5/7
एचडीएफसी बँक 17 जानेवारी 2026 ला तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. सिस्टमॅटिक्स रिसर्चनुसार बँकेचा निव्वळ नफा 11.2 टक्क्यांनी वाढू शकतो. अजीत मिश्रा यांनी शेअर खरेदीचा सल्ला दिला असून 1220 रुपये टारगेट प्राईस दिलं आहे.
Continues below advertisement
6/7
दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून विचार करणाऱ्यांसाठी एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणं एक संधी असू शकते. मात्र, गुंतवणूकदारांना तज्ज्ञांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.
7/7
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Sponsored Links by Taboola