Share Market tips : शेअर बाजारात गुंतवणूक करताय मग 'या' चुका टाळा
उत्पन्नाचे स्रोत, चांगल्या परताव्यासाठी गुंतवणुकीचा पर्याय म्हणून अनेकजण शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत. मात्र, अनेकजण शेअर बाजारात गुंतवणूक करताना काही चुका करतात आणि त्यांना मोठा फटका बसतो. शेअर बाजारात गुंतवणूक करताना ही चूक टाळणे योग्य ठरेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेअर बाजारात इतरांच्या सल्ल्याने गुंतवणूक करणे टाळावे. गुंतवणूक करणार असलेल्या स्टॉकची माहिती घेऊन गुंतवणुकीचा निर्णय स्वत: घ्यावा. शेअर मार्केट समजून घेतल्याशिवाय गुंतवणूक करणे टाळावे
शेअर बाजारात घसरण सुरू असताना घाबरून जाऊ नका. बाजार घसरत असताना अनेकजण पैसे बुडतील या भीतीने तोट्यात शेअर विकतात. अनेकजण दीर्घ मुदतीनंतर चांगल्या परताव्यासह शेअर्स विकतात.
गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळेल या आशेवर अनेकजण शेअर बऱ्याच कालावधीसाठी ठेवतात. हा निर्णय अंगलट येऊ शकतात. गुंतवणुकीवर परताव्याचे एक प्रमाण निश्चित करून शेअर विक्री करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
image 5
गुंतवणुकदार पेनी स्टॉक्स म्हणजे अतिशय स्वस्तातील कंपन्यांचे शेअर्स घेतात. अपवाद वगळता कंपन्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह असते. पेनी स्टॉक्सच्या नादात अनेकजण आपल्या बचतीचे पैसे गमावून बसतात.
शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी शेअर मार्केट तज्ज्ञ, आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेऊन निर्णय घ्यावा