Asian Paints : तिसऱ्या तिमाहीचा रिपोर्ट आला, एशियन पेंट्सचा नफा दुप्पट, शेअरमध्ये एका गोष्टीमुळं घसरला,शेअरधारकांकडून विक्री सुरु

Asian Paints Share : एशियन पेंटसच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. तिसऱ्या तिमाहीचा रिपोर्ट आल्यानंतर शेअरमध्ये घसरण सुरु झाली आहे.

एशियन पेंट्सचा शेअर घसरला

1/5
एशियन पेंटसचा शेअर आज 5 टक्क्यांनी घसरला. डिसेबरला संपलेल्या तिमाहीत कंपनीची कामगिरी कमजोर राहिल्याचं समोर आल्यानंतर एशियन पेंटसच्या शेअरमध्ये घसरण झाली. 5 टक्क्यांपर्यंत घसरण झाल्यानंतर शेअर थोडासा सावरला.
2/5
एशियन पेंटसचा तिसऱ्या तिमाहीतील नफा 1110 कोटी इतका झाला आहे. वार्षिक कामगिरीचा आधार घेतल्यास त्यामध्ये 23 टक्के घसरण झाली आहे. एका वर्षापूर्वीच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीला 1448 कोटींचा फायदा झाला होता. सध्या एशियन पेंटसचा शेअर 2283.45 रुपयांवर पोहोचला आहे.
3/5
गेल्या वर्षभरात एशियन पेंटसच्या शेअरमध्ये जवळपास 22 टक्के घसरण झाली आहे. तर, सहा महिन्यात शेअर 26.75 टक्क्यांनी घसरला आहे. 52 आठवड्यामध्ये उच्चांकी पातळीवर हा शेअर 3394.90 रुपयांपर्यंत पोहोचला होता.
4/5
एशियन पेंटसचा शेअर आज जरी घसरला असला तरी आठ दिवसांमध्ये 41 रुपयांनी वाढला आहे. एशियन पेंटसचं बाजारमूल्य 2.18 लाख कोटी रुपये आहे.
5/5
ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत कंपनीच महसूल 6 टक्क्यांनी घसरला आहे. कंपनीचा महसूल 8549 कोटी रुपये आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीचा महसूल 9103 कोटींचा होता. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत नफा 60 टक्क्यांनी वाढला आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफ 695 कोटी रुपये होता. एशियन पेंटसची स्थापना 1942 मध्ये झाली होती. 1968 पासून या कंपनीचं भारतीय बाजारपेठेत वर्चस्व आहे. सध्या कंपनी 60 देशात सेवा पुरवते. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Sponsored Links by Taboola