'या' म्युच्यूअल फंडाने अनेकांवर पाडला पैशांचा पाऊस, 20 हजारांचे दिले 28 लाख रुपये!
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून म्युच्यूअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. म्युच्यूअल फंडात शेअर बाजाराच्या तुलनेत कमी जोखीम असते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) अशाच एका म्युच्यूअल फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएसबीआयचा हा स्मॉल कॅप म्युच्यूअल फंड असून त्याचे नाव 'एसबीआय स्मॉल कॅप फंड- डायरेक्ट ग्रोथ' असे आहे. या म्युच्यूअल फंडाने 20 रुपयांच्या प्रतिमहिन्याच्या गुंतवणुकीवर 5 वर्षांत साधारण 28 लाख रुपये परतावा दिला आहे. म्हणजेच पाच वर्षांत या म्युच्यूअल फंडाने थेट दुप्पट रिटर्न्स दिले आहेत.
या म्युच्यूअल फंडाने पाच वर्षांत सरासरी 30 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न्स दिले आहेत. या म्युच्यूअल फंडाचा एका वर्षाचा परतावा 37.29 टक्के तर 3 वर्षांचा परतावा 24.14 टक्के राहिलेला आहे.
एखाद्या व्यक्तीने प्रत्येकी 20 हजार प्रमाणे या म्युच्यूअल फंडात पाच वर्षांसाठी गुंतवणूक केली असेल तर संबंधित व्यक्तीने एकूण 12 लाख रुपये गुंतवले आहेत. या गुंतवलेल्या पैशांवर वर्षाला सरासरी 30.35 टक्के रिटर्न्स मिळाले आहेत. या गुंतवलेल्या रकमेवर पाच वर्षांसाठी 16.18 लाख रुपये व्याज मिळाले असते. म्हणजेच त्या व्यक्तीला एकूण 28.18 लाख रुपये मिळाले असते.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)