SIP : SBI च्या म्युच्युअल फंडमधील 5000 रुपयांच्या एसआयपीनं गुंतवणूकदारांना 7.22 कोटी मिळाले,करबचतीसाठी परफेक्ट फंडबाबत जाणून घ्या

SIP : स्टेट बँक ऑफ इंडिया लाँग टर्म इक्विटी फंड हा भारतातील सर्वात जुना ईएलएसएस फंड असून तो 32 वर्ष जुना आहे. यामध्ये नियमित गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना याचा लाभ झाला आहे.

Continues below advertisement

म्युच्युअल फंड एसआयपी

Continues below advertisement
1/6
गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांसोबत जेव्हा चर्चा करता तेव्हा ते दीर्घकालीन गुंतवणूक कशी फायद्याची ठरते याबाबत माहिती देतात. स्टेट बँक ऑफ इंडिया म्युच्युअल फंडच्या टॅक्स सेविंग्ज स्कीमबाबत ही गोष्ट खरी ठरली आहे. या फंडनं काही दिवसांपूर्वी 32 वर्ष पूर्ण केली आहेत. हा फंड इक्विटी लिंक्ड सेविंग्ज योजनांपैकी एक आहे.
2/6
ज्या गुंतवणूकदारांनी या म्युच्युअल फंडच्या सुरुवातीपासून 5000 रुपयांची एसआयपी सुरु केली असेल तर त्याच्या गुंतवणुकीचं मूल्य आता 7.22 कोटी रुपये झालं असेल. या फंडची सुरुवात 31 मार्च 1993 ला झाली होती.एसबीआय लाँग टर्म इक्विटी फंड ओपन एंडेड इक्विटी लिंक्ड सेविंग्ज स्कीमपैकी एक आहे. यामध्ये 80 सी नुसार करामध्ये सूट मिळते.
3/6
एसबीआय लाँग टर्म इक्विटी फंडनं दीर्घकालीन लाँग टर्म वेल्थ क्रिएशनचा उद्देश पूर्ण केला आहे. गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. एसबीआय म्युच्युअल फंड हाऊसच्या आकडेवारीनुसार एखाद्या गुंतवणूकदारानं फंड सुरु झाला तेव्हापासून 10 हजारांची एसआयपी सुरु केली असती तर 28 मार्च 2025 ला त्याचं मूल्य 14.44 कोटी रुपये झालं आहे.
4/6
32 वर्षांच्या काळात या गुंतवणूकदारानं गुंतवलेली रक्कम 38.5 लाख रुपये असेल. त्याला वार्षिक सीएजीआर 17.94 टक्के रिटर्न मिळाला आहे. यानुसार जर एखाद्यानं 5000 रुपयांची एसआयपी केली असेल तर त्याला 28 मार्च 2025 ला त्या फंडमधील त्याच्या गुंतवणुकीचं मूल्य 7.22 कोटी रुपये झाले आहे. या फंडचे मॅनेजर दिनेश बालाचंद्रन असून ते सप्टेंबर 2016 पासून व्यवस्थापन करत आहेत.
5/6
एसबीआय लाँग टर्म इक्विटी फंड हा अशा गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर आहे जे कर बचतीसह दीर्घ कालीन गुंतवणुकीद्वारे चांगली वेल्थ निर्मितीचा विचार करतात. करबचतीमुळं या फंडमध्ये ठेवलेले पैसे तुम्ही तीन वर्षांपर्यंत काढू शकत नाही.
Continues below advertisement
6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Sponsored Links by Taboola