डॉलरचा दर वधारल्याने तुमच्या खिशावर कसा परिणाम होणार?
डॉलरच्या तुलनेत रुपयाची सुरू असलेली घसरण थांबण्याची चिन्हं दिसत नाही. मागील काही दिवसांपासून रुपयाची घसरण सुरू आहे. रुपयाच्या घसरणीचा परिणाम सामान्यांच्या खिशावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे होतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारत कच्च्या तेलाची सर्वाधिक आयात करतो. भारतातील इंधनाची गरज भागवण्यासाठी 80 टक्के कच्चे तेल आयात केले जाते.
सरकारी इंधन कंपन्यांकडून डॉलरमध्ये कच्च्या तेलाची खरेदी केली जाते. रुपयाच्या तुलनेत डॉलर महाग झाल्यास भारतीय इंधन कंपन्यांना कच्चे तेल खरेदी करण्यासाठी अधिक डॉलर मोजावे लागतील.
परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खर्चातही वाढ होणार आहे. परदेशातील शिक्षण आणि तेथील वास्तव्याचा खर्च आणखी महाग होण्याची शक्यता आहे.
जून ते ऑगस्ट दरम्यान प्रवेश प्रक्रिया सुरू होते. त्यावेळी डॉलरची किंमत वाढते. डॉलरचा दर वधारल्यास पालकांवर आणखी आर्थिक बोजा पडण्याची शक्यता आहे.
खाद्य तेलाचे दर आधीपासूनच कडाडले आहेत. देशातंर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी खाद्य तेल आयात करण्यात येत आहे.
डॉलरचा दर वाढल्याने खाद्य तेलाच्या आयातीसाठी आणखी परदेशी चलन खर्च करावे लागतील. त्याचा परिणाम खाद्य तेलांच्या किंमतीवर होणार आहे.