Rules Changes from 1st January 2023: उद्यापासून बदलणार 'हे' नियम; तुमच्या खिशावरही होणार परिणाम
1 जानेवारी 2023 पासून GST नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. पाच कोटींपेक्षा जास्त व्यवसायासाठी ई-इनव्हॉइसिंग म्हणजेच इलेक्ट्रॉनिक बिल अनिवार्य असणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपोस्ट ऑफिस योजनेचा व्याजदर वाढणार आहेत. सरकारने पोस्ट ऑफिस योजनांच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. NSC (NSC), मासिक उत्पन्न योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, किसान विकास पत्राचे व्याजदर वाढवण्यात आले आहेत.
2023 या नवीन वर्षामध्ये विमा प्रीमियम ( Insurance Premium ) महाग होण्याची शक्यता आहे. IRDAI वाहनांचा वापर आणि देखभाल यावर आधारित विमा प्रीमियमसाठी नवीन वर्षात नवीन नियम लागू करण्यात येण्याची शक्यता आहे.
तसेच 1 जानेवारीपासून काही बँकांच्या क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉईंटच्या नियमांमध्येही बदल होणार आहे.
1 जानेवारीपासून बँक लॉकरच्या नियमांमध्येही बदल करण्यात येणार आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तू हरवल्यास बँक त्याची जबाबदारी घेईल.
सीएनजी, पीएनजीचे नवीन दर जाहीर होणार आहेत. पेट्रोलियम कंपन्यांकडून दर महिन्याच्या 1 तारखेला इंधनाच्या नवीन किंमती जारी केल्या जातात.