reliance share : रिलायन्सच्या शेअरनं काल उच्चांक गाठला अन् आज मोठी घसरण, 8 महिन्यांच्या निचांकी पातळीवर, एका दिवसात काय घडलं?
reliance share : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये आज 4.47 टक्के घसरण पाहायला मिळाली आहे. आज रिलायन्सचा 70.50 रुपयांनी घसरला.
Continues below advertisement
रिलायन्स इंडस्ट्रीज
Continues below advertisement
1/7
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये 4.47 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक आणि आयटीसीच्या शेअरमधील घसरणीमुळं बाजारावर दबाव दिसून आला. रिलायन्स इंडस्ट्रीजनं काल रात्री प्रसिद्धीपत्रक जारी करत ब्लूमबर्गचा रिपोर्ट नाकारला होता. मात्र, तरी देखील शेअरवर दबाव दिसून आला.
2/7
रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर4.47 टक्क्यांच्या घसरणीसह 1507.60 रुपयांवर पोहोचला. म्हणजेच रिलायन्सच्या शेअरमध्ये 70.50 रुपयांची घसरण झाली. या स्टॉकनं आजच्या दिवशी निचांक 1496.30 रुपयांवर पोहोचला तर आजचा उच्चांक 1569 रुपयांवर पोहोचला आहे. 5 जानेवारीला रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरनं 1611.20 रुपयांचा उच्चांक गाठला आहे.
3/7
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये घसरण झाल्यानं कंपनीचं बाजारमूल्य 20.57 लाख कोटींवर पोहोचलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये घसरण ब्लूमबर्गच्या बातमीनंतर आली आहे. मात्र, रिलायन्स ब्लूमबर्गचा दावा फेटाळला होता.
4/7
ब्लूमबर्गचा रिपोर्ट चुकीचा असल्याचं रिलायन्स इंडस्ट्रीजनं म्हटलं आहे. रशियनं तेलाच्या जहाजाबाबतची बातमी खोटी आहे. जामनगरच्या रिफायनरीला रशियन तेलाची खेप मिळालेली नाही. गेल्या तीन आठवड्यांपासून रशियन तेलाची खेप मिळालेली नाही, असं रिलायन्स इंडस्ट्रीजनं म्हटलं.
5/7
रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर आज 70.80 रुपयांनी घसरुन 1507.30 रुपयांवर आला आहे. रिलायन्सच्या स्टॉकचा 52 आठवड्यांचा निचांक 1114.85 रुपये तर 52 आठवड्यांचा उच्चांक 1611.80 रुपये इतका आहे. गेल्या तीन वर्षात रिलायन्सचा शेअर 18.78 टक्क्यांनी वाढला आहे.
Continues below advertisement
6/7
जेफरीजनं रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ओएनजीसीच्या स्टॉकबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवला आहे. ग्लोबल ब्रोकरेज फर्मच्या मते व्हेनेझुएलाच्या तेलावरील प्रतिबंध हटवल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजला ब्रेंटच्या तुलनेत 5-8 डॉलर प्रति बॅरल स्वस्त तेल खरेदी करता येईल. त्यामुळं त्यांचं ग्रॉस रेवेन्यू मार्जिन वाढेल.
7/7
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 06 Jan 2026 04:27 PM (IST)