RBI : कर्ज घेणं सोपं होणार, UPI प्रमाणं ULI सुरु होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यूपीआय प्लॅटफॉर्ममुळं पैसे पाठवण्याच्या क्षेत्रात मोठे क्रांतिकारी बदल झाले, असं म्हटलं. त्याच पार्श्वभूमीवर कर्ज वितरण प्रणालीत सुलभता आणण्यासाठी यूनिफाइड लेंडिंग इंटरफेसची निर्मिती करण्यात येणार असल्याचं दास यांनी म्हटलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारताच्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बंगळुरुत डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीजच्या कार्यक्रमाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी छोट्या आणि ग्रामीण कर्जदारांना कर्ज वितरणसाठी यूएलआय हा टेक मंच सुरु करणार असल्याचं म्हटलं.
सध्या यूएलआय पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवण्यात येत आहे. याद्वारे कर्ज मंजुरीचा कालावधी कमी करण्यात यश आल्याचं शक्तिकांत दास म्हणाले.
जनधन आधार मोबाईल- यूपीआय आणि यूएलआय हे तीन मंच भारताच्या डिजीटल प्रवासात महत्त्वाची भूमिका पार पाडतील, असं शक्तिकांत दास म्हणाले.
शक्तिकांत दास यांनी या प्लॅटफॉर्मचा फायदा कृषी आणि लघूउद्योजकांना होणार असल्याचं म्हटलं.