2000 रुपयांच्या:नोटा बदलण्याची मुदत संपली, पुढं काय आहेत 'हे' आहेत मार्ग
भारतीय रिझर्व्ह बँकेने 30 सप्टेंबरपर्यंत 2000 रुपयांची नोट बदलून घेण्याची किंवा जमा करण्याची अंतिम मुदत दिली होती
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यानंतर 7 ऑक्टोबर पर्यंत ही मुदत वाढवण्यात आली होती. ही अंतिम मुदत देखील आता संपली आहे.
आता ज्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत, त्यांच्यासाठी आता पुढे काय? असा प्रश्न निर्माण झाला असेल.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार आजपासून कोणतीही बँक 2000 रुपयांचे चलन स्वीकारणार नाही. मात्र, त्यानंतरही या नोटा कायदेशीर राहतील.
दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी तुम्हाला RBI च्या 19 क्षेत्रीय कार्यालयांपैकी एका कार्यालयात जावे लागणार आहे.
तुम्ही कोणत्याही शाखेत जाऊन नोटा बदलून घेऊ शकता किंवा तुमच्या बँक खात्यात जमा करु शकता.
तुम्ही पोस्ट ऑफिसद्वारे RBI कार्यालयात 2000 रुपयांची नोट देखील पाठवू शकता.
तुम्ही अद्याप 2,000 रुपये बदलले नसल्यास, आता तुम्ही RBI च्या 19 कार्यालयांपैकी कोणत्याही एका कार्यालयात जाऊ शकता किंवा पोस्ट ऑफिसद्वारे पाठवू शकता.
2,000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी RBI कोणतेही शुल्क आकारणार नाही.