Railway Fare: मेल-एक्स्प्रेसच्या तिकिटांच्या दरात वाढ; मुंबईतील लोकल प्रवाशांना दिलासा, भारतीय रेल्वेची मोठी घोषणा

Railway Fare: भारतीय रेल्वेने मेल-एक्स्प्रेसच्या तिकिटांच्या दरात वाढ करण्याची मोठी घोषणा केली.

Continues below advertisement

Railway Fare

Continues below advertisement
1/10
भारतीय रेल्वेने मेल-एक्स्प्रेसच्या तिकिटांच्या दरात वाढ करण्याची मोठी घोषणा केली.
2/10
रेल्वेकडून ही भाडेवाढ 26 डिसेंबर 2025 पासून लागू केली जाणार आहे.
3/10
विशेषतः रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता प्रवासासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे.
4/10
ऑर्डिनरी क्लास'मध्ये 215 किलोमीटरपेक्षा कमी प्रवासासाठी कोणताही अतिरिक्त भार टाकण्यात आलेला नाही, म्हणजेच या अंतरासाठी भाड्यात कोणतीही वाढ केलेली नाही.
5/10
215 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवासासाठी ऑर्डिनरी क्लासमध्ये 1 पैसा प्रति किलोमीटर आणि मेल/एक्सप्रेसच्या नॉन-एसी व एसी क्लाससाठी 2 पैसे प्रति किलोमीटर भाडेवाढ लागू होणार आहे.
Continues below advertisement
6/10
भारतीय रेल्वेने केलेल्या या भाडेवाढीमुळे रेल्वेच्या तिजोरीत मोठी भर पडणार आहे. या बदलामुळे सुमारे 600 कोटी रुपयांहून अधिक कमाई होण्याची अपेक्षा रेल्वेने व्यक्त केली आहे.
7/10
एखादा प्रवासी 500 किलोमीटरचा प्रवास नॉन-एसी ट्रेनने करत असेल, तर त्याला सध्याच्या तिकीट दरापेक्षा 10 रुपये जास्त द्यावे लागतील.
8/10
भारतीय रेल्वेने तिकीट दरात केलेली ही या वर्षातील दुसरी वाढ आहे. यापूर्वी 1 जुलै रोजी रेल्वे भाडे वाढवण्यात आलं होतं.
9/10
एकीकडे मेल-एक्स्प्रेसच्या तिकिटांच्या दरात वाढ करण्याची घोषणा करण्यात आली. मात्र दुसरीकडे लोकल प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
10/10
उपनगरीय रेल्वे आणि मासिक सिझन तिकीट म्हणजेच एमएसटीचे दर वाढवण्यात आलेले नाहीत. त्यामुळं मुंबईकरांना मात्र दिलासा कायम आहे.
Sponsored Links by Taboola