New GST Rates: 22 सप्टेंबरपासून इलेक्ट्रॉनिक वस्तूंची किंमत होणार कमी; किती टक्के बचत होईल?, A टू Z माहिती

जीएसटी दरातील या ऐतिहासिक बदलाचा लाभ घरगुती वापरासाठी असलेल्या सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांना मिळणार आहे.

Continues below advertisement

Electronic Goods

Continues below advertisement
1/8
केंद्र सरकारने सणासुदीपूर्वी जीएसटी कपातीच्या रुपात सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. येत्या 22 सप्टेंबर 2025 पासून देशभरात जीएसटीचे (GST) नवीन दर लागू होणार आहेत. यामुळे या वर्षी सणांसाठी खरेदी करणे आधीच्या तुलनेत खूपच स्वस्त होणार आहे.
2/8
सणासुदीपूर्वी केंद्र सरकारने जीएसटी कपात करून सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे.
3/8
22 सप्टेंबर 2025 पासून देशभरात जीएसटीचे नवे दर लागू होतील, ज्यामुळे यंदा सणांची खरेदी मागील वर्षांच्या तुलनेत अधिक स्वस्त ठरणार आहे.
4/8
सरकारने टीव्ही, फ्रीज, एसीसह सर्व इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवरील जीएसटी दर 28 टक्क्यांवरून कमी करून 18 टक्के केला आहे. यामुळे ग्राहकांना अंदाजे 10% बचत होईल आणि या उत्पादनांवर 500 ते 2000 रुपयांपर्यंतचा आर्थिक फायदा मिळू शकतो.
5/8
या ऐतिहासिक बदलाचा फायदा घरातील अनेक इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर मिळेल, यामध्ये टीव्ही, एसी, कूलर, पंखे, डिशवॉशर, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, व्हॅक्यूम क्लीनर, मायक्रोवेव्ह ओव्हन, इलेक्ट्रिक हीटर, मिक्सर, हेजर ड्रायर आणि ट्रिमर यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे.
Continues below advertisement
6/8
तसेच, दैनंदिन वापरातील साबण, डिटर्जेंट, टूथपेस्ट, हेअर ऑइल यांसारख्या तब्बल 99% वस्तूंचा जीएसटी दर 12% वरून कमी करून 5% करण्यात येत आहे.
7/8
जीएसटी परिषदेने 12% आणि 28% कर श्रेणी पूर्णपणे रद्द केल्या आहेत. 22 सप्टेंबरपासून जीएसटी व्यवस्थेत आता फक्त दोन मुख्य दर राहतील 5% आणि 18%.
8/8
याशिवाय, लक्झरी व काही निवडक वस्तूंसाठी 40% चा नवीन जीएसटी स्लॅब लागू केला जाणार आहे.
Sponsored Links by Taboola