सोनं झालं स्वस्त, खरेदी करणाऱ्यांना दिलासा
सोन्याची (Gold) खरेदी करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात (Gold Price) घसरण झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाल देखील सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होते. त्यामुळं सोनं खरेदी करणाऱ्यांना मोठी संधी मिळाली आहे.
आज सोन्याच्या दरात 400 रुपयांची घसरण झालीय. सोन्याचा भाव हा 73 हजार रुपयांच्या खाली आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सोन्याच्या दरात तब्बल 400 रुपयांची घसरण झालीय. त्यामुळे सोन्याचा भाव 73 हजार रुपयांच्या खाली आलाय.
एका बाजूला परदेशी बाजारात सोन्याचे दर वाढत आहेत, तर दुसऱ्या बाजूला भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
देशाची राजधानी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर हा 400 रुपयांनी तर 24 कॅरेट सोन्याचा दर हा 410 रुपयांनी कमी झाला आहे.
चेन्नई, पुणे, मुंबई, केरळ आणि अहमदाबादमध्येही दरात घसरण झालीय. दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,970 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आले आहे
मुंबईत 22 कॅरेट सोन्याला 66,750 तर 24 कॅरेट सोन्याला 72,820 रुपयांचा दर आहे.
पुणे 22 कॅरेट सोन्याला 66,750 तर 24 कॅरेट सोन्याला 72,820 रुपयांचा दर आहे.
दिल्ली 22 कॅरेट सोन्याला 66,900 तर 24 कॅरेट सोन्याला 72,970 रुपयांचा दर आहे.