10 लाख गुंतवा अन् 4.50 लाख व्याज मिळवा! पोस्टाच्या 'या' जबरदस्त योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
Time Deposit Scheme: शासनाच्या पोस्ट ऑफिस विभागातर्फे बचतीच्या अनेक योजना चालावल्या जातात. या योजनांत देशातील लाखो नागरिक पैशांची गुंतवणूक करतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपोस्ट ऑफिसची अशीच एक जबरदस्त योजना आहे. या योजनेच्या मदतीने तुम्ही पाच वर्षांत चांगले व्याज मिळवू शकता.
या योजनेचे नाव टाइम डिपॉझिट स्कीम असे आहे. या योजनेत पाच वर्षांसाठी पैसे गुंतवता येतात. या योजनेत गुंतवलेल्या पैशांतून मिळणाऱ्या रकमेवर वर आकारला जात नाही.
पोस्ट ऑफिसची ही टाईम डिपॉझिट सिक्मी लघू बचत योजना आहे. या योजनेत तुम्ही एकरकमी पैसे भरू शकता. या जोनलेला पोस्ट ऑफिस खात्याची एफडी योजनादेखील म्हटले जाते.
या योजनेअंतर्गत तुम्ही एका वर्षांसाठी पैशांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला जमा केलेल्या रकमेवर 6.90 टक्के व्याज मिळते. दोन वर्षांसाठी पैसे गुंतवल्यास 7.00 टक्के, तीन वर्षांसाठी पैसे गुंतवल्यास 7.10 टक्के तर पाच वर्षांसाठी पैसे गुंतवल्यास 7.50 टक्क्यांनी व्याज मिळते.
या योजनेत तुम्ही जॉईंट खातेदेखील चालू करू शकता. या योजनेत कमीत कमी 1,000 हजार रुपयांपासून जास्तीत जास्त कितीही रुपये गुंतवू शकता.
या योजनेतून मिळणाऱ्या रकमेवर कर आकारला जात नाही. आयकर अधिनियमाच्या कलम 80 सी अंतर्गत 1.50 लाख रुपयांपर्यंत सूट मिळते. तुम्ही या योजनेत पाच वर्षांसाठी 10 लाख रुपये गुंतवल्यास तुम्हाला यातून व्याज म्हणून 4.49 लाख रुपये मिळतात.