नॅशनल सेव्हिंग ते पोस्ट ऑफिस सेव्हिंग, 'या' 7 जबरदस्त बचत योजना तुम्हाला करतील मालामाल!
Small Saving Scheme Interest Rate: तुम्हाला अल्प बचत योजनांत बचत करून चांगला परतावा हवा असेल तर खाली दिलेल्या योजना सर्वोत्तम आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम ही एका प्रकारची एफडी स्कीम आहे. या योजनेत तुम्ही एक, दोन, तीन ते पाच वर्षांपर्यंत पैशांची गुंतवणूक करू शकतो. या योजनेत तुम्ही 1,000 रुपयांच्या पटीत पैसे गुंतवू शकता. या योजनेत प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गतत 1.50 लाख रुपयांपर्यंतची तुम्हाला सूट मिळते. या योजनेत तुम्ही गुंतवलेल्या पैशांवर 1 एका वर्षाला 6.9 टक्के, 2 वर्षांसाठी 7 टक्के, 3 वर्षांसाठी 7.1 टक्के तर 5 वर्षांच्या गुंतवणुकीवर 7.5 टक्के व्याज मिळते.
ज्येष्ठ नागरिकांसाठी सीनियर सिटीजन सिव्हिंग स्कीम योजना आहे. या योजनेत 1,000 रुपयांपासून ते 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेत प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गतत 1.50 लाख रुपयांपर्यंतची तुम्हाला सूट मिळते. या योजनेत तुम्हाला 8.2 टक्क्यांनी परतावा मिळतो.
पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम स्कीम योजनेत तुम्हाला प्रत्येक महिन्याला रिटर्न्स मिळतात. या योजनेत तुम्ही सिंगल खात्यात 4.5 लाख तर जॉइंट खात्यात 9 लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवू शकता. तुम्ही गुंतवलेल्या रकमेत तुम्हाला 7.4 टक्क्यांनी व्याज मिळते.
4. पोस्ट ऑफिस सेव्हिंग योजनेत तुम्ही 5,000 रुपयांपासन पैशांची गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुम्हाला 4 टक्क्यांपर्यंत व्याज मिळते.
नॅशनल सेव्हिंग स्कीम योजनेत तुम्ही 1000 रुपयांपासून कितीही पैसे गुंतवू शकता. तुम्हाला या योजनेत 7.7 टक्के व्याज मिळते.
पब्लिक प्रोव्हिडेंड फंडमध्येही तुम्ही पैसे गुंतवू शकता. तुम्ही एका वर्षात 500 रुपयांपासून ते 1.50 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करू शकता. तुम्हाला या योजनेत 7.1 टक्क्यांनी रिटर्न्स मिळतात.
किसान विकास पत्र योजनेत तुम्ही 1000 रुपयांपासून जास्तीत जास्ती कितीही पैसे गुंतवू शकता. तुम्हाला या योजनेत 7.5 टक्क्यांनी व्याज मिळते.