काय सांगता? 100 टक्के पैसे थेट दुप्पट होणार, सरकारची भन्नाट योजना, जाणून घ्या स्किम आहे तरी काय?
कोणतीही रिस्क न घेता परताव्याची हमी देणाऱ्या अनेक योजना आहेत. पोस्ट ऑफिस किंवा बँकेतर्फे अशा अनेक योजना चालवल्या जातात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपोस्ट ऑफिसमधील किसान विकास पत्र नावाची योजनादेखील अशाच परताव्याची हमी देते.
या योजनेत शून्य टक्के रिस्क आहे. म्हणजे. तुम्ही या योजनेत पैसे गुतंवल्यास तुमचे पैसे न बुडण्याची हमी मिळते. या योजनेत तुमचे पैसे दुप्पट होण्याचीही हमी दिली जाते.
किसान विकास पत्र या योजनेत तुम्ही सलग 115 महिने म्हणजेच 9 वर्षे 7 महिने गुंतवणूक केली तर तुमचे पैसे थेट दुप्पट होऊ शकतात.
सरकार या योजनेवर सध्या 7.5 टक्क्यांनी परतावा देत आहे. व्याजाची मोजणी ही एका वर्षाच्या हिशोबाने होते.
तुम्ही या योजनेत अगदी 1000 रुपये गुंतवूनही सहभागी होऊ शकता. या योजनेत जास्तीत जास्त पैसे गुंतवण्याची कोणतीही कमाल मर्यादा नाही. तुम्ही या योजनेअंतर्गत कितीही खाते खोलू शकता.
त्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, वयाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईझचे फोटो, योजनेचा अर्ज आदी कागदपत्रे सोबत असणे गरजेचे आहे.
या योजनेत कोणतीही व्यक्ती अर्ज करू शकते. 10 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या मुलांच्या नावानेदेखील पालकांना किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक करता येते. एखादी व्यक्ती एकल किंवा जॉइंट अकाऊंट खोलू शकते. परदेशी नागरिक या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत. तुम्हाला या योजनेत गुंतवलेले पैसे प्रिमॅच्यूअरली काढायचे असतील तर ते 2 वर्षे 6 महिन्यांत काढता येतील.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)