PM Surya Ghar Yojana: सोलर पॅनल लावून तुम्ही सरकारला वीज कशी विकू शकता? एका वर्षाला होईल इतकी कमाई
PM Surya Ghar Yojana: सोलर पॅनल लावून तुम्ही सरकारला वीज कशी विकू शकता? एका वर्षाला होईल इतकी कमाई
सरकार देशभरातील एक कोटी लोकांच्या घरांवर रुफटॉप सोलर पॅनेल बसवण्याच्या तयारीत आहे, त्यासाठी सरकारकडून भरघोस सबसिडीही दिली जात आहे.
1/7
स्वस्त वीज देण्याचा मार्ग केंद्र सरकारने शोधून काढला असून, त्यात आता लोकांच्या घरांवर सोलर पॅनल बसवले जात आहेत.(Photo Credit : freepik )
2/7
पीएम मोदींनी सूर्य घर-मुक्त वीज योजनेंतर्गत एक कोटी कुटुंबांना 300 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे, ज्यामध्ये प्रत्येकाच्या घरात सौर पॅनेल बसवले जातील.(Photo Credit : freepik )
3/7
देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे(Photo Credit : freepik )
4/7
या सौर पॅनेल योजनेत सरकार सुमारे 60 टक्के अनुदान देत आहे. एक किलोवॅट ते दोन किलोवॅटसाठी 30 ते 60 हजार रुपये अनुदान आहे.(Photo Credit : freepik )
5/7
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलर पॅनल बसवल्यानंतर तुम्ही त्यातून दरमहा कमाई करू शकता. खुद्द पंतप्रधान मोदींनी ही माहिती दिली.(Photo Credit : freepik )
6/7
जर तुम्ही घरामध्ये सोलर पॅनल लावले असतील आणि तुम्ही त्यातून सुमारे 300 युनिट वीज तयार करत असाल, तर तुमचा वापर फक्त 150 युनिट असेल, तर तुम्ही उर्वरित वीज विकू शकता.(Photo Credit : freepik )
7/7
तुम्ही दर महिन्याला सरकारी वीज कंपन्यांना वीज विकू शकता, ज्यातून तुम्हाला वार्षिक 15 ते 20 हजार रुपये मिळू शकतात.(Photo Credit : freepik )
Published at : 16 Feb 2024 06:18 PM (IST)