PM Kisan च्या 21 व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी अपडेट, सरकारकडून नोटिफकेशन जारी, 'या' शेतकऱ्यांना पैसे मिळणं थांबणार
PM Kisan : केंद्र सरकारनं फेब्रुवारी 2019 पासून पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात.
पीएम किसान
1/5
केंद्र सरकारनं पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे आतापर्यंत शेतकऱ्यांना 20 हप्त्याद्वारे लाभ देण्यात आला आहे. पीएम किसान सन्मान निधीद्वारे एका हप्त्यात 2000 रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले जातात.
2/5
पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हप्त्यांची रक्कम जमा झाली आहे. नरेंद्र मोदींच्या हस्ते वाराणसी येथून 2 ऑगस्ट रोजी पीएम किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता जारी करण्यात आला. या हप्त्यात 9 कोटी 71 लाख 41 हजार 402 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्यात आले.
3/5
पीएम किसान सन्मान निधीच्या वेबसाईटवर एक नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. त्यामध्ये काही संशयास्पद प्रकरणं आढळल्याचं म्हटलंय.
4/5
पीएम किसान सन्मान निधीच्या योजनेच्या निकषांचं उल्लंघन होणाऱ्या दोन बाबी सांगण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी 1 फेब्रुवारी 2019 नंतर शेतजमीन खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय एकाच कुटुंबातील एक पेक्षा अधिक शेतकरी लाभ घेत असल्याचं निदर्शनास आलं आहे. यामध्ये पती पत्नी, 18 वर्षांवरील सदस्य किंवा 18 वर्ष पूर्ण नसलेली मुलं यांचा समावेश आहे.
5/5
1 फेब्रुवारी 2019 जमीन खरेदी केलेले शेतकरी आणि एकाच कुटुंबातील एका पेक्षा अधिक लाभार्थी यांची प्रत्यक्ष पडताळणी होत नाही तोपर्यंत त्यांचा लाभ थांबवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी पीएम किसानच्या वेबसाईटवर Know Your Status ला भेट देऊन स्थिती तपासावी असं आवाहन करण्यात आलं आहे.आता शेतकऱ्यांचं लक्ष पीएम किसानचा 21 वा हप्ता कधी मिळणार याकडे लक्ष लागलंय.
Published at : 14 Sep 2025 08:58 PM (IST)