Personal Loan : वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
Personal Loan : वैयक्तिक कर्ज सहजपणे मिळत असलं तरी ते जोखीमयुक्त असतं. ईएमआय, व्याज, फी आणि कर्ज परतफेड कालावधी याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.
Continues below advertisement
वैयक्तिक कर्ज
Continues below advertisement
1/6
सध्या वैयक्तिक कर्ज सहजपणे मिळतं. बँक ॲपद्वारे प्री अप्रुव्ह कर्जाची ऑफर मिळते. काही क्लिक आणि कागदपत्रं अपलोड करताच वैयक्तिक कर्जाची रक्कम कर्जदाराच्या खात्यात थेट पोहचते. प्रक्रिया सोपी वाटत असल्यास काही गोष्टींकडे लक्ष न दिल्यास जोखीम वाढते.
2/6
वैयक्तिक कर्ज सर्वात महागड्या कर्ज पर्यायांपैकी मानलं जातं. घाई घाईनं निर्णय घेतल्यास ईएमआय दीर्घकाळ भरावा लागू शकतो. कोणताही विचार न करता कर्ज घेतल्यास त्रास होऊ शकतो. बहुतांश कर्जदार कर्ज निवडताना ईएमआयची रक्कम पाहतात.
3/6
कर्जदारांना कमी ईएमआय आकर्षक वाटतात. मात्र, ईएमआय दीर्घकाळ भराव लागतो. म्हणजे अधिक महिने आणि अधिक व्याज भरावा लागू शकतो. तीन वर्ष किंवा पाच वर्ष व्याज खर्च वाढवतो. काही वेळ अतिरिक्त ईएमआय आणि कमी कालावधी असलेलं कर्ज स्वस्त मिळतं.
4/6
विविध बँकांची कर्जांच्या व्याज दराची तुलना केल्याशिवाय कर्ज घेऊ नये. काही कर्जदार त्यांचं खातं ज्या बँकेत असतं तिथून वैयक्तिक कर्ज घेतात. मात्र, वैयक्तिक कर्जाचे व्याज दर प्रत्येक बँकेचे किंवा कर्ज देणाऱ्या संस्थेचे वेगवेगळे असतात. व्याज दर 1 टक्के अधिक असल्यास दीर्घकाळात अधिक फरक पडतो. तुमची बँक, दुसरी बँक किंवा दुसऱ्या एनबीएफसी बँकांच्या व्याज दराची तुलना करण्यास 15 मिनिटं लागतात.
5/6
अनेकदा कर्जदारांकडून डॉक्यूमेंटेशन चार्ज, इन्शुरन्स ॲड ऑन याकडे दुर्लक्ष करु नये. 2 टक्के प्रोसेसिंग फीचा अर्थ तुमचे 6000 रुपये कपात केले जातात. जीएसटी जोडल्यास ही रक्कम वाढते. कर्ज देण्यापूर्वीच ही रक्कम कपात केली जाते.
Continues below advertisement
6/6
आवश्यकतेपेक्षा अधिक काळ कर्ज परतफेडीसाठी निवडल्यास अधिक व्याज भरावं लागू शकतं. त्यामुळं कमी कालावधी निवडल्यास अधिक व्याज द्यावं लागणार नाही.
Published at : 20 Dec 2025 11:56 PM (IST)