Investment Tips: बचत आणि कर सवलतीचा फायदा हवाय? बँकांच्या या स्किममध्ये करा गुंतवणूक
Tax Saving FD Schemes: आर्थिक वर्ष संपल्यानंतर नोकरदार वर्गाला कर जमा करावा लागतो. त्यासाठी ITR फाइल करावा लागतो. बचतीसह कर सवलत मिळवून देणाऱ्या योजनांकडे अनेकांचा ओढा असतो. कर सवलतीसह चांगला परतावा देणाऱ्या योजनेबाबत जाणून घ्या...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुदत ठेव योजनेत कर सवलत मिळू शकते. बँक ग्राहकांना कर सवलतीसाठी आणि चांगल्या परताव्यासाठी हा पर्याय आहे. मागील काही वर्षांपासून बँकांनी मुदत ठेव व्याज दरात वाढ केली आहे. यामध्ये स्मॉल फायनान्स बँक आणि स्मॉल प्रायव्हेट बँकेचाही समावेश आहे.
काही बँका ग्राहकांना 7.4 टक्क्यापर्यंत परतावा देतात. जाणून घेऊयात कोणत्या बँकांकडून ग्राहकांना कर सवलत मुदत ठेवीवर चांगला परतावा देत आहेत.
Deutsche Bank आपल्या टॅक्स सेव्हिंग मुदत ठेवीवर आपल्या ग्राहकांना 7 टक्क्यांपर्यंत परतावा देतात. त्याशिवाय, हे उत्पन्न आयकर कायद्याच्या 80 सी नुसार 1.5 लाखापर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळते.
AU Small Finance Bank ग्राहकांना 6.9 टक्क्यापर्यंतचा परतावा देत आहे. त्याशिवाय 1.5 लाख रुपयापर्यंतच्या कर सवलतीचा फायदा मिळतो. या स्किममधअये गुंतववणूक केल्यास पाच वर्षानंतर तुम्हाला 1.5 लाखाचे 2.12 लाख रुपये मिळतील.
Suryoday Small Finance Bank ग्राहकांना 6.75 टक्के दराने वार्षिक परतावा आपल्या गुंतवणुकीवर देत आहे. यावर 1.5 लाख रुपयांची आयकर रिबेटही मिळते.
Ujjivan Small Finance Bank कडून मुदत ठेवीवर 7.4 टक्क्यांचा परतावा मिळतो. त्याशिवाय, यावर 1.5 लाख रुपयांची आयकर सवलतही मिळते.