Best Multibagger Stock : 'या' मल्टीबॅगर शेअरनं केलं मालामाल, 40-45 हजार रुपये गुंतवून कोट्यधीश
स्टाइलम इंडस्ट्रीज (Stylam Industries) ची गणना शेअर बाजारातील सर्वोत्तम मल्टीबॅगर स्टॉकमध्ये केली जाते. (Image Source:istock)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्टाइलम इंडस्ट्रीजने गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे. स्टाइलम इंडस्ट्रीज कंपनी स्मॉल कॅप श्रेणीतील आहे. (Image Source:istock)
या कंपनीचे बाजार भांडवल सध्या केवळ 3,230 कोटी रुपये आहे, पण कंपनीचे शेअर्स स्वस्त नाहीत. सध्या स्टाइलम इंडस्ट्रीजच्या एका शेअरची किंमत 1,916 रुपये आहे. (Image Source:istock)
शुक्रवारी स्टाइलम इंडस्ट्रीजच्या शेअरच्या किमतीत 1.62 टक्क्यांनी वाढ झाली. गेल्या एका महिन्यात या स्टॉकची किंमत 22 टक्क्यांनी वाढली आहे. (Image Source:istock)
गेल्या 6 महिन्यांत हा शेअर सुमारे 85 टक्क्यांनी आणि या वर्षाच्या सुरुवातीपासून 70 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. (Image Source:istock)
स्टाइलम इंडस्ट्रीजचे शेअर्स आता महाग असले, तरी एकेकाळी हा स्टॉक 10 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध होते. सुमारे 11 वर्षांपूर्वी स्टाइलम इंडस्ट्रीजच्या एका शेअरची किंमत फक्त 8.13 रुपये होती. (Image Source:istock)
स्टाइलम इंडस्ट्रीजच्या शेअर्सनी गेल्या 11 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 235 पेक्षा जास्त परतावा दिला आहे. (Image Source:istock)
सोप्या शब्दात, या शेअरने 11 वर्षांपूर्वी गुंतवलेले 1 लाख रुपये 2.35 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहेत. (Image Source:istock)
त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांनी 11 वर्षांपूर्वी स्टाइलम इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 40-45 हजार रुपये गुंतवले होते आणि ते शेअर्स ठेवले आहेत ते आता कोट्यधीश झाले असतील. (Image Source:istock)