पैशांचे असे करा नियोजन, बचत करण्यासह कर्जातून व्हाल मुक्त!
पैशांचे असे करा नियोजन, बचत करण्यासह कर्जातून व्हाल मुक्त!
1/5
अनेकांचे आर्थिक गणित बिघडत असल्याचे बचतीसाठी पैसे शिल्लक राहत नाही. त्याशिवाय कर्जाचा डोंगर वाढण्याची शक्यता असते. योग्य प्रकारे नियोजन केल्यास पैशांची बचत होण्यास मदत होईल.
2/5
तुम्ही तुमच्या घराचे मासिक बजेट तयार करा. यामध्ये सर्व खर्च समाविष्ट करा. तुमच्या मासिक उत्पन्नातील 30 टक्के रक्कम ही आपात्कालीन स्थितीसाठी, 20 टक्के रक्कम ही भविष्यातील तरतुदींसाठी ठेवावी.
3/5
वीज बिल, फोन बिल, जेवण, अन्नधान्य आदींसाठी होणाऱ्या खर्चाची नोंद करून ठेवा. यामुळे तुम्ही किती अनावश्यक खर्च करता हे लक्षात येईल आणि भविष्यात हा खर्च टाळता येईल.
4/5
तुम्ही पैसे खर्च करताना विचार करा. दूध, फळं, भाजी जर ऑनलाइन पद्धतीने मागवणे स्वस्त होत असल्यास त्याला प्राधान्य द्या. अन्यथा जवळपासच्या दुकानातून खरेदी करा. अधिकाधिक बचत करण्याचा प्रयत्न करा.
5/5
क्रेडिट कार्डचा वापर आणीबाणीच्या स्थितीत करावा. क्रेडिट कार्डचा वापर शक्यतो टाळावा. क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरावे.
Published at : 03 Mar 2022 03:03 PM (IST)