पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यानंतर LIC भरणार प्रीमियम
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाने (Life Insurance Corporation of India) एक खास योजना सुरू केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएलआयसीकडून विविध विमा योजना सुरू आहेत. ग्राहकांना फायदेशीर ठरतील असे वेगवेगले प्लान आहेत.
एलआयसीच्या 'जीवन लक्ष्य पॉलिसी'मध्ये (LIC Jeevan Lakshya Plan) चांगला परतावा मिळू शकतो.
जीवन लक्ष्य पॉलिसीमध्ये पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यानंतरही पॉलिसी मॅच्युअरिटी पूर्ण होते.
पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास कंपनीच प्रीमियमचा खर्च उचलते. तर, 10 टक्के हिस्सा हा Sum Assured च्या स्वरुपात दरवर्षी नॉमिनीला दिले जातात.
एलआयसी जीवन लक्ष्य योजना ही 13 ते 25 वर्षांच्या मुदतीसाठी आहे. या पॉलिसीत 18 ते 55 वर्षातील वयोगटातील व्यक्ती गुंतवणूक करू शकते.
पॉलिसी मॅच्युअर होण्याच्या कालावधीच्या तीन वर्ष आधीपर्यंत प्रीमियम भरावा लागतो. वयाच्या कमाल 65 व्या वर्षापर्यंत पॉलिसी मॅच्युअर होऊ शकते.
या योजनेत पॉलिसीधारकाला एक लाख रुपयांपर्यंतची Sum Assured रक्कम मिळते. या योजनेत तुम्ही दरमहा, तीन महिने, सहा महिने अथवा वार्षिक पद्धतीने प्रीमियम भरू शकता.
या पॉलिसीमध्ये विमाधारकाचा पॉलिसी मॅच्युअर होण्याआधीच मृत्यू झाल्यास एलआयसीकडून प्रीमियमचा खर्च उचलला जातो.
पॉलिसी मॅच्युअर होईपर्यंत दरवर्षी Sum Assured चे 10 टक्के नॉमिनीला दिले जातात. पॉलिसी मॅच्युअरिटीनंतर सगळे पैसे नॉमिनीला दिले जातात.