तुमच्याकडे ATM Card आहे? मिळू शकतो 5 लाखांचा फायदा
मागील काही वर्षांपासून एटीएम कार्डचा वापर वाढू लागला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appव्यवहारासाठी एटीएम-डेबिट कार्डला प्राधान्य दिले जात आहे.
एटीएम कार्डचा आणखी एक फायदा आहे.
एटीएम कार्डवर तुम्हाला 5 लाख रुपयांचा विमा मिळतो.
सार्वजनिक आणि खासगी बँकेच्या एटीएम कार्डवर तुम्हाला Complimentary Insurance Cover देखील मिळतो.
तुम्हाला Complimentary Insurance Cover चा फायदा हवा असेल तुम्ही एटीएम कार्डचा कमीत कमी 45 दिवस वापर करणे आवश्यक आहे.
बँकेच्या एटीएम कार्डवर तुम्हाला Accidental Insurance चा फायदा मिळतो.
विम्यासाठी तुम्हाला कोणताही प्रीमियम भरावा लागत नाही. हा प्रीमियम बँकेकडून भरला जातो.
तुमच्याकडे असलेल्या कार्डच्या श्रेणीनुसार तुम्हाला Insurance Cover मिळतो.
एटीएम कार्डधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या बँक खात्याचा वारस एटीएम कार्डवर मिळणारा अपघाती विम्यावर दावा करू शकतो.
कार्डधारकाचा मृत्यू झाल्यास 45 दिवसांच्या आत बँकेत जाऊन विम्यावर दावा करावा लागेल.