Credit Card Tips: क्रेडिट कार्ड मोठ्या फायद्याचे, जाणून घ्या कसं?
देशात वाढत्या डिजिटलायझेशनसह क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appक्रेडिट कार्डधारकांच्या संख्येत मोठी वाढ होऊ लागली असल्याचे चित्र दिसत आहे.
क्रेडिट कार्ड वापरावर मिळणारी सवलत, कॅशबॅक, रिवॉर्ड पॉईंट्स, गिफ्ट कार्ड्स आदी पर्याय मिळत असल्याने युजर्सच्या संख्येत वाढ होत आहे.
क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शॉपिंगचे बिल दिल्यास तुम्हाला एक महिन्यांचा ग्रेस पीरियड मिळतो.
हा ग्रेस पीरियड 18 ते 55 दिवसांपर्यंत असू शकतो. त्यामुळे तुम्हाला शॉपिंगचे बिल देण्यास काही दिवसांचा अवधी मिळतो.
क्रेडिट कार्डधारकाला अचानक पैशांची आवश्यकता भासल्यास बँकेकडून क्रेडिट कार्डवर कर्ज मिळू शकते.
क्रेडिट कार्डचे बिल पेमेंट वेळेवर दिल्यास क्रेडिट स्कोअर चांगला राहतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यास अडचणी निर्माण होत नाहीत.
सध्या अनेक क्रेडिट कार्डवर ग्राहकांना टर्म अथवा अॅक्सीडेंटल डेथ कव्हरचा फायदा मिळतो. त्यासाठी तुम्हाला वेगळा प्रीमियम द्यावा लागत नाही.
क्रेडिट कार्डवर ऑनलाइन शॉपिंगवर कॅशबॅक, गिफ्ट कार्ड्स, व्हाउचर, डिस्काउंट, फ्यूल रिचार्जवर रिवॉर्ड मिळतात.
तुम्ही एखाद्या वेळेस क्रेडिट कार्डवर मोठ्या किंमतीची खरेदी केल्यास तुम्ही त्याचे बिल तीन ते 48 महिन्यांच्या कालावधीत ईएमआयवर देऊ शकता.