Post Office Saving: पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये मिळतोय चांगला परतावा, किती दिवसात होणार पैसे दुप्पट?
पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांच्या गरजेनुसार विविध प्रकारच्या बचत योजना चालवते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक योजनांनुसार, गुंतवणूकदारांना वेगवेगळा व्याज दर दिला जातो.
पोस्टाच्या बचत योजनेत नियमित गुंतवणूक करून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो.
पोस्टातील गुंतवणूक ही जोखमीमुक्त, सुरक्षित असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यास हा चांगला पर्याय आहे.
किसान विकास पत्र ही स्मॉल सेव्हिंग योजना लोकप्रिय आहे. या योजनेत 123 महिन्यात तुमचे पैसे दुप्पट होतील. या योजनेत 6.9 टक्के व्याज दर मिळतो.
सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणुकीवर 7.6 टक्के व्जाज दर मिळतो. यामध्ये साधारणपणे 10 वर्षात गुंतवणूक दुप्पट होते.
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजना ही 5 वर्षांसाठी आहे. या योजनेत साधारणपणे 10 ते 11 वर्षात तुमची गुंतवणूक दुप्पट होते.
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत 6.8 टक्के व्याज दर आहे.
सिनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम (SCSS) ही 60 वर्षांवरील व्यक्तींसाठी आहे.
SCSS या योजनेत गुंतवणुकीवर 7.4 टक्क्यांचा परतावा मिळतो. साधारणपणे 10 वर्षात गुंतवणूक दुप्पट होते.
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममध्ये (MIS) गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरमहा एक निश्चित रक्कम मिळू शकते. या गुंतवणुकीत तु्म्हाला 6.6 टक्के व्याज दर मिळतो.