Credit Card Tips: पहिल्यांदा क्रेडिट कार्ड घेताय? या टिप्स ठरतील फायदेशीर
बदलत्या काळानुसार क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appक्रेडिट कार्डचा वापर करून एक महिना विनाव्याज खरेदी करतात. त्यानंतर एक महिन्यानंतर बिल भरतात.
क्रेडिट कार्डचा वापर करणे हे खूप फायदेशीर आणि सोयीचे आहे.
परंतु जर तुम्ही त्याचा योग्य वापर केला नाही तर तुम्ही कर्जाच्या विळख्यात अडकू शकता.
पहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घेताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
क्रेडिट कार्ड घेताना त्याचा व्याजदर आणि इतर शुल्कांची माहिती घ्या.
कमी जॉइनिंग फीसह पहिले कार्ड घेण्यावर भर द्या. सध्या अनेक पहिल्या वर्षांसाठी शुल्क आकारण्याची ऑफर देतात.
क्रेडिट कार्ड घेताना त्याची क्रेडिट लिमिट तपासणे अत्यंत आवश्यक आहे.
क्रेडिट कार्डची लिमिट ही तुमचा पगार, बिल-कर्ज भरण्याबाबत तुम्ही आधी घेतलेला वेळ आदी मुद्यांवर अवलंबून असतो.
क्रेडिट कार्ड घेताना रिवॉर्ड पॉइंट्स आणि कॅशबॅकबद्दल नक्कीच माहिती घ्या.
यासोबतच क्रेडिट कार्ड खरेदी केल्यानंतर दर महिन्याला क्रेडिट कार्ड स्टेटमेंट तपासा.
त्यामुळे तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे किती पैसे खर्च केले हे तुमच्या लक्षात येईल आणि अनावश्यक खर्च टाळला जाईल.