Paytm Payments Bank Crisis : पेटीएम पेमेंट बँक होणार बंद; Paytmला आहेत हे आघाडीचे 'टॉप 5' पर्याय!
विनाकटकट व्यवहारांपासून ते नवोन्मेष्कारी सुविधांपर्यंत तुमच्या बँकिंगविषयक गरजांसाठी सर्वांत अनुकूल पर्याय निवडा आणि आर्थिक व्यवहारांच्या भविष्यकालीन पर्यायासह काळाच्या पुढे राहा. (Photo Credit : ABP Majha )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफोनपे (PhonePe): फोनपे पैसे चुकते करण्यासाठी, पैशाच्या हस्तांतरासाठी आणि मोबाइल फोन्स रिचार्ड करण्यासाठी अखंडित व संरक्षित मार्ग देऊ करतो. यूजर-फ्रेण्डली इंटरफेस आणि व्यापाऱ्यांच्या विस्तृत नेटवर्कच्या माध्यमातून फोनपे दैनंदिन व्यवहार देशभरातील कोट्यवधी वापरकर्त्यांसाठी सुलभ करून देते. (Photo Credit : ABP Majha )
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आणि विश्वासू बँकिंग सहयोगींचे पाठबळ असलेली आणि फोनपे सेवा खात्रीशीरता व सोय यांची निश्चिती करते. त्यामुळेच ती डिजिटल बँकिंगच्या गरजांसाठी पसंतीचा पर्याय ठरत आहे. (Photo Credit : ABP Majha )
मोबिक्विक (MobiKwik): अत्याधुनिक एनक्रिप्शन आणि सर्वोच्च दर्जाच्या सुरक्षितता सुविधांच्या जोरावर मोबिक्विक वापरकर्त्याला सुरक्षित व्यवहार करण्याची मुभा देते. त्यामुळे आर्थिक उपक्रम निश्चिंत मनाने करणे शक्य होते. मोबिक्विक वॉलेटसह अनेक डिजिटल वित्तीय सोल्यूशन्सचा सर्वसमावेशक समूह मोबिक्विक देऊ करते. (Photo Credit : ABP Majha )
त्यामुळे रिचार्ज ते बिले चुकती करणे आणि ऑनलाइन खरेदी अशी व्यवहारांची विस्तृत श्रेणी शक्य होते. मोबिक्विक यूपीआय एकात्मीकरणामुळे दोन बँक खात्यांतील हस्तांतर व्यवहार अखंडितपणे होतात. वापरकर्त्याला लवचिकतेने व्यवहार करता येतात. (Photo Credit : ABP Majha )
झिप पे लेटरच्या माध्यमातून मोबिक्विक ग्राहकांना आत्ता खरेदी करून नंतर पैसे देण्याची सुविधा देते. त्यामुळे ग्राहक तत्काळ पैसे चुकते करण्याची चिंता सोडून मुक्तपणे खरेदी करू शकतात. मोबिक्विक झिप ईएमआय सुविधाही पुरवते. (Photo Credit : ABP Majha )
त्याद्वारे वेतनदार व स्वयंरोजगारित व्यक्तींना १०,००० ते २ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. त्यासाठी ते ३ महिने ते २४ महिन्यांच्या मुदतीतील ईएमआयचे पर्याय निवडू शकतात. (Photo Credit : ABP Majha )
अमेझॉन पे (Amazon Pay): अमेझॉन पे अखंडित व्यवहारांसाठी सर्वसमावेशक सेवांचा समूह देऊ करते. अमेझॉन परिसंस्थेत एकात्मीकरण झाल्यामुळे वापरकर्ते विनासायास काही क्लिक्समध्ये खरेदी करू शकतात, बिले चुकती करू शकतात आणि मोबाइल फोन रिचार्ज करू शकतात.(Photo Credit : ABP Majha )
अमेझॉन वॉलेट पेमेंट पद्धती स्टोअर करण्याचे तसेच सुरक्षितपणे व्यवहार व्यवस्थापित करण्याचे सोयीस्कर मार्ग पुरवते. अमेझॉनच्या काटेकोर सुरक्षितता मानकांद्वारे ही सेवा एक संरक्षित व सोयीस्कर प्लॅटफॉर्म देऊ करते. अमेझॉन पेद्वारे कोट्यवधी वापरकर्ते निश्चिंतपणे व्यवहार करू शकतात. (Photo Credit : ABP Majha )
गूगल पे (Google Pay): वापरकर्त्यांना सुरक्षितपणे पैसे पाठवण्याची, बिले चुकती करण्याची व ऑनलाइन खरेदी करण्याची क्षमता देऊन गूगल पेने डिजिटल व्यवहार सुलभ केले आहेत. गुगल वॉलेटच्या माध्यमातून ही सेवा तुम्हाला दैनंदिन आवश्यक बाबी सुरक्षितपणे उपलब्ध करून देते.(Photo Credit : ABP Majha )
वापरकर्ते पेमेंट पद्धती साठवू शकतात आणि व्यवहार विनासायास व्यवस्थापित करू शकतात. गूगलच्या ठोस सुरक्षितता उपायांच्या तसेच नवोन्मेषाप्रती बांधिलकीच्या जोरावर, गूगल पे जगभरातील कोट्यवधी वापरकर्त्यांना अखंडित व खात्रीशीर पेमेंट अनुभव देते. (Photo Credit : ABP Majha )
जिओ पेमेंट्स बँक (Jio Payments Bank): जिओ पेमेंट्स बँक आपल्या यूजर-फ्रेण्डली मोबाइल अॅपद्वारे बँकिंग व पेमेंट सोल्यूशन्सची वैविध्यपूर्ण मालिका देऊ करते.(Photo Credit : ABP Majha )
पारंपरिक बँकिंग सुविधांशिवाय, वापरकर्ते जिओ वॉलेटच्या सोयीस्कर सुविधांचा लाभ घेऊन अखंडित व्यवहार व संरक्षित निधी व्यवस्थापन करू शकतात. उपलब्धता व नवोन्मेष यांच्याशी बांधिलकी राखून, जिओ पेमेंट्स बँक देशभरातील वापरकर्त्यांना विनासायास वित्त व्यवस्थापनाची मुभा देते.(Photo Credit : ABP Majha )