PAN Card Surrender : तुमच्याकडे दोन पॅनकार्ड आहेत? मग लगेचच एक सरेंडर करा, अन्यथा तुरुंगवास भोगावा लागेल
PAN Card : कोणतेही आर्थिक व्यवहार करताना पॅन कार्ड गरजेचं असतंच. मग ते इनकम टॅक्स रिटर्न भरणं असो वा मालमत्ता खरेदी करणं, दागिने खरेदी करणं असो वा, बँक खातं उघडणं प्रत्येक महत्त्वाच्या आर्थिक कामासाठी पॅन कार्ड वापरणं आवश्यक आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयकर विभागाकडून पॅनकार्ड तयार करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पण अनेक वेळा पॅन कार्ड बनवताना एकापेक्षा जास्त वेळा पॅन कार्ड तयार केलं जातं. पण तुम्हाला माहीत आहे का? एकापेक्षा जास्त पॅनकार्ड असणं बेकायदेशीर आहे. जर तुम्ही चुकून एकापेक्षा जास्त पॅनकार्ड बनवले असतील, तर त्यातील एक ताबडतोब सरेंडर करा. नाहीतर तुम्हाला कारवाईला सामोरं जावं लागू शकतं.
आयकर विभागानं एकापेक्षा जास्त पॅनकार्ड सरेंडर करण्याची संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट केली आहे. तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं अतिरिक्त पॅन कार्ड सरेंडर करू शकता. पॅन कार्ड सरेंडर करण्याच्या प्रक्रियेबद्दल जाणून घेऊया.
तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पॅनकार्ड असल्यास, आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्ही तुमचा वॉर्ड शोधू शकता. त्यानंतर तेथील अधिकाऱ्याची अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तुम्ही पॅन कार्ड सरेंडर करू शकता.
हा अर्ज देताना तुम्हाला 100 रुपयांचा बाँड भरावा लागेल. तुमच्या पॅनकार्डचा तपशील घेतल्यानंतर वॉर्ड ऑफिसर तुम्हाला एक रिसिप्ट देईल. यासोबतच काही मूळ कागदपत्रंही सादर करावी लागणार आहेत. त्यानंतर काही दिवसांत पॅनकार्ड सरेंडर करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
इनकम टॅक्सनुसार, एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असणं बेकायदेशीर आहे. असं केल्यास तुम्हाला 6 महिन्यांचा तुरुंगवास किंवा 10,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.