NTPC Green Share : लॉक इन कालावधी संपताच एनटीपीसी ग्रीनच्या शेअरमध्ये घसरण, गुंतवणूकदारांकडून विक्री सुरु
NTPC Green Share : एनटीपीसी ग्रीन एनर्जी या कंपनीनं तीन महिन्यांपूर्वी आयपीओ आणला होता, तेव्हा किंमतपट्टा 108 रुपये निश्चित करण्यात आला होता.
Continues below advertisement
एनटीपीस ग्रीन एनर्जी शेअर
Continues below advertisement
1/7
एनटीपीसीची उपकंपनी असलेल्या एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या आयपीओचा लॉक इन कालावाधी संपला आहे. तीन महिन्यांच्या लॉक इनचा कालावधी संपल्यानं शेअरधारक त्यांच्या शेअरची विक्री करु शकतात.
2/7
कंपनीच्या एकूण शेअर पैकी 2 टक्के म्हणजेच 18.33 कोटी शेअरच्या ट्रेडिंगला लॉक इन कालावधी संपल्यानंतर मुभा मिळेल. लॉक इन कालावाधी संपला म्हणजे सर्वच्या सर्व शेअर विकले जात नाहीत. तर, ते ट्रेडिंगसाठी पात्र ठरतात.
3/7
एनटीपीसी या मूळ कंपनीकडे एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे 89 टक्के मालकी आहे. एनटीपीसी ग्रीन च्या आयपीओच्या माध्यमातून काही प्रमाणात भागिदारी कमी करण्यात आली होती.
4/7
एनटीपीसी ग्रीन एनर्जीनं डिसेंबरला संपलेल्या तिमाहिती 4.1 टक्के वाढ नोंदवली आहे. मात्र, ईबीआयटीडीए मध्ये 2.3 टक्क्यांची घट दिसून येते. एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा शेअर 11 फेब्रुवारीला 108 रुपयांच्या खाली आला. तेव्हापासून शेअरमध्ये घसरण सुरु आहे. गेल्या सहा सत्रात देखील एनटीपीसी ग्रीनचा शेअर घसरला.
5/7
एनटीपीसी ग्रीनचा आयपीओ लिस्ट झाल्यानंतर शेअर 155 रुपयांच्या उच्चांकापर्यंत पोहोचला होता. तर, शुक्रवारी बाजार बंद झाला होता तेव्हा शेअर 105.5 रुपयांवर होता. सध्या शेअर 8 रुपयांनी घसरुन 97.30 रुपयांवर पोहोचला आहे.
Continues below advertisement
6/7
आज (24 फेब्रुवारी) बाजार सुरु झाल्यानंतर सेन्सेक्स 571 अंकांनी कोसळला तर निफ्टी 175 अंकांनी खाली आली आहे. भारतीय भांडवली बाजारात पहिल्याच दिवशी घसरण झाली. आशियाई बाजारात सुरुवातीलाच घसरण दिसून आल्यानंतर भारतीय बाजारावर देखील परिणाम झाला.
7/7
अमेरिकेच्या कमकुवत आर्थिक आकड्यांमुळे जागतिक बाजारावर परिणाम झाला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 10 पैशांनी मजबूत झाला. डॉलरच्या तुलनेत रुपया 86.58 वर उघडला आहे.(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 24 Feb 2025 09:42 AM (IST)