भारताच्या कंटेट क्रिएटर्सनी यूट्यूबवरुन किती रुपये कमावले? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एबीपीच्या मंचावरुन आकडेवारी मांडली

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी एबीपी न्यूज नेटवर्कच्या India@2047 या समिटमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं.

नरेंद्र मोदी

1/5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एबीपी नेटवर्कच्या India@2047 या समिटमध्ये सहभाग घेतला. त्यांनी डिजीटल इंडियावर भाष्य करत भारतीय कंटेंट क्रिएटर्सनी यूट्यूबवरुन 21 हजार कोटी रुपयांची कमाई केल्याचं सांगितलं.
2/5
नरेंद्र मोदी म्हणाले, प्रगतीसाठी आपली संस्कृती सोडण्याची गरज नाही. डिजीटल इंडिया आपल्या जीवनाचा भाग झाला आहे. डिजीटल इंडियानं एक नव जग बनवलं आहे. गेल्या तीन वर्षात भारतीय क्रिएटर्सला 21 हजार कोटी रुपये मिळाले आहेत.
3/5
नरेंद्र मोदी या समिटमध्ये म्हणाले की आज भारताकडे पाणारे लक म्हणतात की लोकशाही व्यवस्था चांगला परिणाम दाखवू शकतो.
4/5
ते पुढं म्हणाले की आपण काही जिल्ह्यांना अतिमागास जिल्हे हा दर्जा देऊन सोडून दिलं होतं, ते जिल्हे आज चांगली कामगिरी करत आहेत. आदिवासींनी देखील विश्वास आहे की डेमोक्रॅसी कॅन डिलिव्हर, असं मोदी म्हणाले.
5/5
भारतानं मानवकेंद्री जागतिकीकरणाचा मार्ग स्वीकारला आहे. लोकांची स्वप्न पूर्ण होऊ शकतात, लोकांच्या सन्मानासह विकास होतोय. आज देश जीडीपी केंद्रित राहण्यापेक्षा ग्रॉस इम्पॉवरमेंट ऑफ पीपल बनला आहे, असं मोदी म्हणाले.
Sponsored Links by Taboola