नारायण मूर्ती ते अजीम प्रेमजी! भारतातील टॉप टेक अब्जाधीशांची संपत्ती वाचून धक्क व्हाल!
image 1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRichest Indian Tech Billionaires 2024: सध्याच्या तंत्रज्ञानामुळे माणवाच्या जीवनात अनेक बदल जाले आहेत. भारतात असे काही दिग्गज आहेत, जे आज तंत्रज्ञानाच्या जोरावर कोट्यधीश झाले आहेत. यामध्ये HCL कंपनीचे शिव नादर Infosys चे नारायण मूर्ती यांचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर भारतातील टॉपचे 10 टेक अब्जाधीशांची माहिती जाणून घेऊ या
HCL Technologies चे संस्थापक शिव नादर भारतातील सर्वात श्रीमंत टेक क्षेत्रातील उद्योजक आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात सध्या एचसीएल ही दिग्गज टेक कंपनी म्हणून नावारुपाला आली आहे. फोर्ब्सनुसार त्यांची एकूण संपत्ती ही 34.7 अब्ज डॉलर्स आहे.
टेक अब्जाधीशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर IT कंपनी Wipro चे माजी अध्यक्ष अजीम प्रेमजी यांचे नाव येते. त्यांची एकूण संपत्ती 11.8 अब्ज डॉलर्स आहे.
ग्लोबल आयटी कंपनी Infosys चे सरसंस्थापक एन आर नारायण मूर्ती टेक आब्जाधीशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 4.4 अब्ज डॉलर्स आहे.
या यादीत चौथ्या क्रमांकावर जोहो कॉर्पोरेशनच्या सहसंस्थापक राधा वेम्बू आहेत. त्यांची एकूण संपत्ती 3.3 अब्ज डॉलर्स आहे.
सेनापती गोपालकृष्णन हेदेखील आयटी क्षेत्रातील एक दिग्गज उद्योजक आहेत. ते Infosys या आयटी कंपनीचे सहसंस्थापक आहेत. त्यांच्याकडे एकूण 3.2 अब्ज डॉलर्स संपत्ती आहे.
Infosys कंपनीचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी हेदेखील टेक अब्जाधीशांच्या यादीत असून त्यांची एकूण संपत्ती 2.9 अब्ज डॉलर्सच्या आसपास आहे.
Info Edge (India) Limited कंपनीचे सहसंस्थापक संजीव बिखचंदानी हेदेकील टेक अब्जाधीशांच्या यादीत आहेत. त्यांची एकूण संपत्ती 2.9 अब्ज डॉलर्स रुपये आहे.
Zoho Corporation कंपनीचे सहसंस्थापक श्रीधर वेम्बू हेदेखील टेक अब्जाधीश असून त्यांच्याकडे एकूण 2.5 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.
टॉप-10 टेक अब्जाधीशांच्या यादीत दहाव्या स्थानावर आनंद देशपांडे यांचे नाव येते ते Persistent Systems या आयटी कंपनीचे सहसंस्थापक आहेत. फोर्ब्सनुसार त्यांच्याकडे एकूण 2.2 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.