Mutual Fund : गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय वाटू लागला अनसेफ, म्युच्युअल फंडाची काळजी वाढवणारी आकडेवारी
Mutual Fund : म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत घट झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये फेब्रुवारीतील गुंतवणूक घटलीय.
Continues below advertisement
म्युच्युअल फंड गुंतवणूक
Continues below advertisement
1/5
भारतीय शेअर बाजारात गेल्या सहा महिन्यांपासून घसरण सुरु आहे. 61 लाख एसआयपी खाती बंद झाल्याची माहिती देखील समोर आली होती.
2/5
आता असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इंडियाच्या आकडेवारीनुसार जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीत घसरण झाली आहे.
3/5
जानेवारी महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये 39687 कोटी रुपयांचा इनफ्लो आला होता. तर, फेब्रुवारी महिन्यात यामध्ये 26 टक्के घसरण झाली असून ती 29303 कोटी रुपये आहे.
4/5
मिडकॅप फंड्स आणि स्मॉल कॅप फंड्समध्ये देखील इनफ्लो घटला आहे. फेब्रुवारी महिन्यात मिड कॅपमध्ये 3406 कोटी तर स्मॉल कॅपमध्ये 3722 कोटी रुपयांचा इनफ्लो आला. तर जानेवारीमध्ये मिडकॅप फंडमध्ये 5147 कोटी रुपये तर स्मॉल कॅपमध्ये 5720 कोटी रुपये जमा झाले.
5/5
लार्ज कॅप फंडमध्ये देखील इन्फ्लो घसरला आहे. फेब्रुवारीत या फंडमध्ये 2866 कोटी रुपयांचा इन्फ्लो आला आहे. जानेवारीत इन्फ्लोची रक्कम 3063 कोटी रुपये होती. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Continues below advertisement
Published at : 12 Mar 2025 01:16 PM (IST)