Multibagger Stock : 5 वर्षात 9800 टक्के परतावा, 25 हजारांचे बनले 25 लाख, मल्टीबॅगर स्टॉकची किमया
रबर उद्योगातील एका कंपनीच्या शेअरनं 5 वर्षात 9800 टक्के परतावा दिला आहे. गेल्या पाच वर्षापूर्वी कंपनींचा शेअर 10 रुपये देखील नव्हता. सध्या हा शेअर 950 रुपयांवर पोहोचला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या 2 वर्षात शेअरमध्ये 400 टक्के तर एक वर्षात शेअर 57 टक्क्यांनी वाढला आहे. या स्टॉकचं नाव आहे टीना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी होय. ही कंपनी वेस्ट टायर्सला डाऊनस्ट्रीम वॅल्यू अॅडेड उत्पादनांमध्ये रुपांतरीत करते. या कंपनीचे चार प्लांट भारतात असून एक प्लांट ओमानमध्ये आहे.
2025 मध्ये टीना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरमध्ये 31 टक्के घसरण झाली आहे. कंपनीचं बाजारमूल्य 1600 कोटी रुपये आहे. शेअरचं दर्शनी मूल्य 10 रुपये आहे. डिसेंबर 2024 पर्यंत प्रमोटर्सकडे 71.01 टक्के भागिदारी होती.
19 फेब्रुवारी 2020 ला या कंपनीच्या शेअरची किंमत 9.55 रुपये होती. ती 13 मार्च 2025 ला 949.95 रुपये झाली आहे. म्हणजेच या कालावधीत शेअरनं 9847.12 टक्के परतावा दिला आहे.
टीना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या शेअरमध्ये 5 वर्षांपूर्वी ज्याच्याकडे 25000 होते त्याची किंमत 25 लाख रुपये झाले आहेत. ज्यांच्याकडे 50000 रुपयांचे शेअर असतील त्याचे 49 लाख रुपये झाले असतील.
बीएसईवर हा शेअर 52 आठवड्यांमध्ये 2179.20 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला होता. 28 जून 2024 ला शेअर उच्चांकावर पोहोचला होता. डिसेंबर 2024 ला संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा फायदा 7 कोटी रुपये होता.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)