Multibagger Stock : 26 रुपयांच्या स्टॉकनं 5 वर्षात दिला 325 टक्के परतावा, कंपनीचा नफा 45 टक्के वाढला,गुंतवणूकदार मालामाल
Sudarshan Pharma : सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या स्टॉकनं गुंतवणूकदारांना 325 टक्के परतावा दिला आहे. यामुळं गुंतवणूकदार मालामाल झालेत.
मल्टीबॅगर स्टॉक
1/5
फार्मा कंपनी सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीजचे शेअर सोमवारी चर्चेत राहू शकतात. कंपनीनं शुक्रवारी 2024-25 या आर्थिक वर्षातील कामगिरीचे निकाल जाहीर केले आहेत. या कंपनीचा शेअर शुक्रवारी 26.66 रुपयांवर बंद झाला.
2/5
सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीज या कंपनीनं गुंतवणूकदारांना गेल्या पाच वर्षात 325 टक्के परतावा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या सहामाहीत कंपनीच्या निव्वळ विक्रीत 19 टक्के वाढ झाली असून ती 277कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
3/5
सुदर्शन फार्माचा निव्वळ नफा 43 टक्क्यांनी वाढून 7 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर संपूर्ण आर्थिक वर्षासाठी कंपनीची विक्री 9 टक्के वाढून 505 कोटींपर्यंत पोहोचली आहे. कंपनीचा वार्षिक निव्वळ नफा 45 टक्क्यांनी वाढून 16 कोटींवर पोहोचला आहे.
4/5
सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीज लिमिटेडचं बाजाररमूल्य 642 कोटी रुपये आहे. भारताचा फार्मास्युटिकल उद्योग जवळपास 2021 मध्ये 42 अब्ज डॉल्रसचा होता. जो 2024 पर्यंत 50 अब्ज डॉलर्स पर्यंत वाढल्याचा अंदाज आहे.
5/5
सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीजची स्थापना 2008 मध्ये झाली असून कंपनी रसायनं आणि औषधांच्या निर्मितीमध्ये कार्यरत आहे. कंपनीनं गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 04 May 2025 09:09 PM (IST)