Multibagger Stock: केवळ 2 वर्षात दीड रुपयांचा शेअर 585 रुपयांवर आला, 38665 टक्के रिटर्न, गुंतवणूकदार मालामाल

Multibagger Stock : शेअर बाजारात सध्या घसरण सुरु असली तरी काही कंपन्यांच्या स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे.

मल्टीबॅगर स्टॉक

1/6
मनोरंजन क्षेत्रातील कंपनीनं गुंतवणूकदारांना गेल्या दोन वर्षात दमदार परतावा दिला आहे. बीएसईवरील आकडेवारीनुसार हा शेअर 2 वर्षात 38655 टक्के वाढला आहे.
2/6
श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क लिमिटेडच्या शेअरमध्ये दमदार तेजी दिसून आली आहे. गेल्या पाच वर्षात या कंपनीच्या स्टॉकमध्ये 51687 टक्के तेजी दिसून आली आहे.
3/6
सध्या श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क लिमिटेडकडे मस्ती, दबंग धमाल गुजरात, दिल्लगी आणि मायबोली चॅनेल्सची मालकी आहे. कंपनीचं बाजारमूल्य सध्या 1400 कोटी रुपये आहे. डिसेंबर 2024 पर्यंत प्रमोटर्सचा यास्टॉकमधील वाटा 59.33 टक्के आहे.
4/6
श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्कचा शेअर बीएसईवर 26 मार्च 2025 ला 2 टक्क्यांनी वाढून 585.20 रुपयांवर बंद झाला. 24 मार्च 2023 ला या कंपनीचा शेअर 1.51 रुपयांवर होता.
5/6
24 मार्च 2023 ला ज्या गुंतवणूकदाराकडे 20000 रुपयांचे शेअर असतील त्यांच्या गुंतवणुकीचं मूल्य 77 लाख रुपये झालं असेल. तर, ज्याच्याकडे 30 हजार रुपयांचे शेअर असतील त्याची गुंतवणूक 1 कोटी रुपयांवर पोहोचली असेल.
6/6
श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्कची स्थापना 1985 मध्ये झाली होती. शेअर बाजारात लिस्ट झालेली देशातील टीव्ही प्रॉडक्शन कंपनी होती. बीएसईवर ही कंपनी 1995 मध्ये लिस्ट झाली होती. या कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक 2197.70 रुपयांपर्यंत पोहोचला होता. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Sponsored Links by Taboola