Multibagger Stock : 5 वर्षात 'या' स्टॉकनं दिला 5578 टक्के रिटर्न, 1 लाख रुपयांचे बनले 56 लाख
Dynacons Systems and Solutions : या कंपनीच्या स्टॉकनं गुंतवणूकदारांना 5578 टक्के रिटर्न दिला आहे. यामुळं गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.
डायनाकॉन्स सिस्टीम्स अँड सोल्यूशन्स
1/6
आयटी कंपनी डायनाकॉन्स सिस्टीम्स अँड सोल्यूशन्सच्या शेअर 5 वर्षात 56 पटीनं वाढला आहे. तर, 2 वर्षात 200 टक्के वाढला आहे. तर, 2 आठवड्यात 19 टक्के मजबूत झाला आहे.
2/6
अलीकडच्या काळात कंपनीला एलआयसीकडून 138.44 कोटी रुपयांचं डिजिटल वर्कप्लेस सोल्यूशन्सचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. हे येत्या तीन वर्षात पूर्ण करावं लागणार आहे.
3/6
डायनाकॉन्स सिस्टीम्सची स्थापना 1995 मध्ये झाली होती. या कंपनीचं मुख्यालय मुंबईत आहे. तर, बाजारमूल्य 1500 कोटी रुपये आहे. मार्च 2025 अखेर प्रमोटर्सकडे 60.95 टक्के शेअर आहेत.
4/6
पाच वर्षांपूर्वी या कंपनीचा शेअर 20 रुपयांवर होता. 23 एप्रिल 2020 ला या कंपनीचा शेअर20.5 रुपयांवर होता. तर, 23 मार्च 2025 ला कंपनीचा शेअर 1164.05 रुपये आहेत. पाच वर्षात 5578.29 टक्के रिटर्न दिला आहे.
5/6
ज्या गुंतवणूकदारानं 25 हजारांचे शेअर घेतले असतील त्याचे 14 लाख रुपये झाले असतील. तर, ज्यानं 1 लाखांचे शेअर घेतले असतील त्याचे 56 लाख रुपये झाले असतील. जर ते गुंतवणूकदारानं कायम ठेवले असतील तर त्याला फायदा झाला असेल. कंपनीली ऑक्टोबर-डिसेंबर 2024 च्या तिमाहीत निव्वळ नफा 18.31 कोटी रुपये झाला होता.
6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 24 Apr 2025 12:02 AM (IST)