Multibagger Stock: चार वर्षात अडीच लाखांचे एक कोटी रुपये बनले, दोन वर्षात 'या' मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1845 टक्के तेजी
Multibagger Stock : कोलॅब प्लॅटफॉर्मस या कंपनीचं बाजारमूल्य 1300 कोटी रुपये आहे. मार्च 2025 च्या अखेर पर्यंत कंपनीमध्ये प्रमोटर्सकडे 33.88 टक्के शेअर्स होते.
मल्टीबॅगर स्टॉक
1/5
स्पोर्टस टेक्नोलॉजी सोल्यूशन्स सेवा देणाऱ्या कोलॅब प्लॅटफॉर्मसचा शेअरमध्ये गेल्या चार वर्षात 4200 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. चार वर्षांपूर्वी या शेअरची किंमत 5 रुपये देखील नव्हती. सध्या हा शेअर 127 रुपयांवर पोहोचला आहे.
2/5
बीएसईनुसार शेअरमध्ये 2 वर्षात 1845 टक्के तेजी पाहायला मिळाली. तर, सहा महिन्यात हा शेअर 926 टक्के वाढला आहे. ही कंपनी लीग, प्रोफेशनल टीम्स आणि अॅथलिटसला मॅनेज करण्यासह स्पोर्टस ड्रिवन प्लॅटफॉर्म, नेक्स्ट जनरेशन फॅन एंगेजमेंट टूल्स क्षेत्रात काम करते.
3/5
कोलॅब प्लॅटफॉर्मचा शेअर बीएसईवर 24 एप्रिलला 2 टक्क्यांनी वाढून 127.60 रुपयांवर पोहोचला आहे. हा शेअर 22 एप्रिल 2021 ला 2.97 रुपयांवर होता. म्हणजेच या शे शेअरमध्ये 4 वर्षात 4196 टक्के तेजी दिसून आली आहे.
4/5
ज्या गुंतवणूकदारानं 4 वर्षांपूर्वी या कंपनीचे 50 हजार रुपयांचे शेअर खरेदी केले असतील आणि अजून पर्यंत विकले नसतील त्याचं सध्याचं मूल्य 21 लाख रुपये झालं असेल. ज्या व्यक्तींन 1 लाखांचे शेअर खरेदी केले असतील त्याचे 43 लाख रुपये झाले असतील. ज्या गुंतवणूकदारानं या कंपनीत चार वर्षांपूर्वी अडीच लाख रुपये गुंतवले असतील त्याचं मूल्य 1 कोटींच्या पुढं गेलं आहे.
5/5
गेल्या तीन महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये 220 टक्के तेजी आली आहे. या कंपनीचं बाजारमूल्य 1300 कोटी रुपये आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 या तिमाहीत कंपनीचा नफा 93 लाख रुपये इतका आहे. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 25 Apr 2025 12:01 AM (IST)