Mobikwik IPO : आयपीओ ओपन होताच एका तासात 100 टक्के सबस्क्राइब, गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ग्रे मार्केटमध्ये तेजी
भारतीय शेअर बाजारात तीन आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले झाले. यामध्ये विशाल मेगा मार्ट, वन मोबिक्विक सिस्टीम्स लिमिटेड, साई लाइफ सायन्स लिमिटेड या तीन कंपन्यांचा समावेश आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवन मोबिक्विक सिस्टीम्स लिमिटेडचा आयपीओच्या माध्यमातून 572 कोटी रुपयांच्या उभारणीचा प्रयत्न होता. कंपनीचं हे उद्दिष्ट पूर्ण झालं आहे. कंपनीचा आयपीओ पहिल्या एका तासात 100 टक्के सबसक्राइब झाला.
मोबिक्विकचा आयपीओ गुंतवणकीसाठी 13 डिसेंबरपर्यंत खुला राहिल. हा आयपीओ सबस्क्राइब करण्यासाठी एका लॉटमध्ये 53 शेअर घ्यावे लागतील. कंपनीनं जारी केलेल्या किंमतपट्ट्यानुसार एका शेअरसाठी 279 रुपये निश्चित करण्यात आली असून 14787 रुपय एका लॉटसाठी लावावे लागगतील.
ग्रे मार्केट प्रीमियमवर मोबिक्विकच्या आयपीओचा जीएमपी 48 टक्क्यांवर दाखवत आहे. म्हणजेच एक शेअर 415 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. जीएमपीनुसार लिस्टींग झाल्यास गुंतवणूकदारांना प्रति शेअर 136 रुपये फायदा मिळू शकतो. मात्र, यापेक्षा कमी किंवा अधिक किंमतीला आयपीओ लिस्ट होऊ शकतो.
या कंपनीच्या आयपीओचं लिस्टींग 18 डिसेंबरला बीएसई आणि एनएसईवर होणार आहे. मोबिक्विकच्या आयपीओमध्ये ऑफर फॉर सेल असणार नाही. कंपनी गुगल पे, फोन पे, पेटीएमची स्पर्धक कंपनी आहे.