Mhada Lottery 2024 : म्हाडा मुंबईच्या लॉटरीसाठी अर्जदारांची यादी जाहीर करणार, डोमिसाईल प्रमाणपत्राबाबत घेतला मोठा निर्णय
Mhada Lottery 2024 : म्हाडानं मुंबईतील 2030 घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. या लॉटरीसाठी अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ देण्यात आली होती.
म्हाडा मुंबई लॉटरी ड्रॉ
1/6
म्हाडानं मुंबईतील 2030 घरांसाठी सोडत जाहीर केली होती. या लॉटरीसाठी जवळपास 1 लाख 34 हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 1 लाख 13 हजार 568 उमेदवारांनी अर्जांसोबत अनामत रक्कम जमा केली होती. त्यानंतर म्हाडानं ज्यांचं अर्जाचं शुल्क भरायचं राहिलं होतं त्यांना मुदवाढ दिली होती.
2/6
म्हाडाकडून मुंबईतील पहाडी गोरेगाव, वडाळा, विक्रोळी, दादर, कुर्ला, मालाड, दिंडोशी यासह विविध ठिकाणच्या घरांसाठी अर्ज मागवले होते.
3/6
म्हाडानं सुरुवातीला घरांच्या लॉटरीसाठी अर्ज करण्याची मुदत 4 सप्टेंबरपर्यंत ठेवली होती. मात्र, मुदतवाढ देत ती मुदत 19 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली होती. या निर्णयाचा म्हाडाला फायदा झाला.
4/6
म्हाडा आज पहिली अर्जदारांची यादी जाहीर करणार आहे. ही यादी जाहीर झाल्यानंतर त्यावर आक्षेप घेण्यासाठी वेळ दिला जाईल. त्यानंतर 3 ऑक्टोबरला अंतिम यादी जाहीर केली जाईल.
5/6
म्हाडाच्या घरांसाठी एक लाखांहून अधिक अर्ज दाखल झाल्यानं म्हाडाला केवळ अर्जांतून 5 कोटींहून अधिक उत्पन्न मिळालं आहे.
6/6
म्हाडानं पुढील सोडतीपासून डोमिसाईलच्या अटीमध्ये शिथिलता दिली आहे. अर्ज दाखल करताना जुनं डोमिसाईल चालू शकतं मात्र, घराचा ताबा घेण्यापूर्वी नवं डोमिसाईल जमा करावं लागेल. जे 1 जानेवारी 2018 नंतरचं असणं आवश्यक आहे.
Published at : 26 Sep 2024 03:17 PM (IST)