In Pics : MG Astor SUV भारतात पुढील महिन्यात लॉन्च होणार, काय आहेत अॅडव्हान्स फीचर?
MG Motor ने आपली नवीन SUV MG Astor कार पुढील महिन्यात भारतात लाँच करण्याची तयारी केली आहे. ही मध्यम आकाराची एसयूव्ही पर्सनल एआय असिस्टंटने सुसज्ज असेल. या कारचं हे खास वैशिष्ट्य आहे, जे माणसांप्रमाणे इमोशन आणि आवाजात काम करते. (photo tweeted by : @MGMotorIn)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएमजी एस्टरचा हा पर्सनल AI असिस्टंन खूप खास आहे. हे कारच्या डॅशबोर्डवर बसवण्यात आले आहे आणि त्यासोबत एक स्क्रीन देखील देण्यात आली आहे. हे आपल्या व्हॉईस कमांडवर काम करते. आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्याबरोबरच, सनरूफ उघडणे आणि बंद करणे यासारख्या विविध कामांमध्ये मदत करण्यास सक्षम आहे. पर्सनल AI असिस्टंट अमेरिकेच्या स्टार डिझाईन कंपनीने तयार केले आहे.(photo tweeted by : @MGMotorIn)
एमजी-एस्टरमध्ये i Smart Hub देखील देण्यात आले आहे. या अंतर्गत, तुम्हाला MapMyIndia सह मॅप आणि नेव्हिगेशन, जिओ कनेक्टिव्हिटी, KoineArth द्वारे ब्लॉकचेन प्रोटेक्टेड डिजिटल पासपोर्ट अशी अनेक वैशिष्ट्ये मिळतात. (photo tweeted by : @MGMotorIn)
यासह, आपण MG Astor मध्ये JioSaavn अॅपद्वारे आपल्या आवडत्या संगीताचा आनंद घेऊ शकता. यामध्ये, तुम्ही हेड युनिटच्या मदतीने तुमच्या कारसाठी पार्किंग स्लॉट आरक्षित करू शकता. (photo tweeted by : @MGMotorIn)
MG Astor मध्ये अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्ट सिस्टम (ADAS) तंत्रज्ञान वापरले गेले आहे. बॉश कंपनीने हे तंत्रज्ञान तयार केले आहे. ADAS हे रडार तंत्रज्ञान आहे जे रस्त्यावरील धोक्यांबाबत ड्रायव्हरला सतर्क करते. एमजी मोटर आपल्या ग्लॉस्टर एसयूव्हीमध्ये हे तंत्रज्ञान वापरत आहे. (photo tweeted by : @MGMotorIn)
कंपनीने या एसयूव्हीमध्ये ऑटोनोमस लेव्हल-2 तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. हे तंत्रज्ञान भारतातील इतर कोणत्याही कारमध्ये नाही. हे एक अॅडव्हान्स ऑटोमॅटिक तंत्रज्ञान आहे जे कार नियंत्रित करते. (photo tweeted by : @MGMotorIn)
याशिवाय, रियर ड्राइव्ह असिस्ट, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, कॉलिशन वॉर्निंग, इंटेलिजंट हेडलॅम्प कंट्रोल, अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन फंक्शन, स्पीड असिस्ट सिस्टम सारख्या अनेक अॅडव्हान्स फीचर्स देखील एमजी एस्टरमध्ये देण्यात आल्या आहेत. अँड्रॉइड ऑटो आणि Apple कारप्ले कनेक्टिव्हिटी आणि पॅनोरामिक सनरूफ, 6 एअरबॅग आणि एलईडी हेडलॅम्पसह 10.1 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील मिळते. (photo tweeted by : @MGMotorIn)