मोठी बातमी, 4849 एकर आकारी पड जमीन शेतकऱ्यांना पुन्हा मिळणार, सरकारही फायद्यात, तिजोरीत पैसा येणार

Marathi News : राज्यातील 8849 एकर आकारी पड जमीन शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानसभेत याबाबतचं विधेयक मंजूर झालं आहे.

आकारी पड जमीन

1/6
महाराष्ट्राच्या जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 220 मध्ये सुधारणा करण्याचं विधानसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर आकारी पड जमीन परत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
2/6
शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकारकडे जमा झालेल्या आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार आहेत. कलम 220 नुसार शेतकऱ्यांच्या जमिनी तगाई, कर्ज, शेतसारा न भरल्यानं त्या जप्त होऊन आकारी पड होऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे येतात.
3/6
या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळवायच्या बाजार भावाच्या 25 टकके रक्कम वसूल करुन मूळ खातेदारांना किंवा त्यांच्या वारसदारांना ही जमीन परत करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
4/6
शेतकऱ्यांना आकारी पड जमिनी परत मिळणार असून याचा फायदा छोट्या आणि अल्प भू धारक शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणर आहे.
5/6
कायदा दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानं 1 हजार 93 प्रकरणे निकालात निघणार आहेत. राज्य सरकारनं या संदर्भातील निर्णय 2 जानेवारीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता.
6/6
प्रस्तावित विधेयक विधान परिषेदत मंजूर झाल्यानंतर राज्यपालांच्या मान्यतेनंतर त्याचं कायद्यात रुपातंर होईल. 4 हजार 849.71 एकर क्षेत्र आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार आहेत. चालू वर्षाच्या प्रचलित बाजारमूल्याच्या प्रस्तावित २५ टक्के रक्कम ऐवजी ५ टक्के रक्कम शासनास जमा करावी लागेल.
Sponsored Links by Taboola