LIC News : शेअर बाजारात गुंतवणूक; एलआयसीला 42 हजार कोटींचा फायदा
LIC ही भारतातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापक आहे. एलआयसीच्या अखत्यारीत अब्जावधींची मालमत्ता आहे. त्याशिवाय एलआयसी ही भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठी गुंतवणुकदार संस्था आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएलआयसीकडून जवळपास 25 टक्के इक्विटीमध्ये गुंतवणूक होते, असे एलआयसीचे व्यवस्थापकीय संचालक राज कुमार यांनी सांगितले.
एलआयसीने शेअर बाजारातून 42 हजार कोटींचा नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्ष 2021-2022 एलआयसीची ही कमाई झाली आहे.
त्याआधी वर्ष 2020-21 मध्ये एलआयसीने 36 हजार कोटींचा नफा कमावला होता.
शेअर बाजारातील गुंतवणुकीतून एलआयसीने चांगली कमाई केली असली तरी कंपनी बाजारात लिस्ट झाल्यानंतर गुंतवणुकदारांना फटका बसला आहे.
एलआयसीच्या शेअर दरात घसरण होत असून संचालक मंडळाने मोठा लाभांशही दिला नाही. अवघा 1.5 रुपयांचा लाभांश एलआयसीने जाहीर केला आहे.