LIC : एलआयसीकडून भागधारकांना गुड न्यूज, एका शेअरवर 1 बोनस मिळणार,लिस्टिंगनंतर पहिल्यांदा बोनस शेअर जारी करणार
LIC : एलआयसीनं त्यांच्या गुंतवणूकदारांना 1:1 बोनस शेअर देण्याचा निर्णय घेतला आहे. एका शेअरवर एक अतिरिक्त शेअर गुंतवणूकदारांना मिळणार आहे.

एलआयसी बोनस शेअर जारी करणार
1/6
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीनं त्यांच्या भागधारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या संचालक मंडळानं 1:1 बोनस शेअर जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच एखाद्या गुंतवणूकदाराकडे एलआयसीचा एक शेअर असेल तर रेकॉर्ड डेटनुसार 1 अतिरिक्त शेअर मोफत मिळेल. म्हणजेच शेअरची संख्या दुप्पट होईल.
2/6
एलआयसी बोनस इश्यूनुसार 632.49 कोटी रुपयांचे नवे इक्विटी शेअर जारी करेल, ज्याची दर्शनी किंमत 10 रुपये असेल. कंपनी 6324.99 कोटी रुपयांची रक्कम त्यांच्या राखीव निधीतून आणि सरप्लसमधून कॅपिटलाइज करेल. बोनस इशूनंतर कंपनीचं पेड अप शेअर कॅपिटल 6324 कोटी रुपयांनी वाढून 12649.99 कोटी होईल.
3/6
एलआयसीकडे 31 डिसेंबर 2025 पर्यंत 1.46 लाख कोटींचा रिझर्व्ह शिल्लक आहे, ज्यातून बोनस शेअर जारी करण्यास सपोर्ट केला जात आहे. शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार एलआयसीचे 21 लाख रिटेल भागधारक आहेत. ज्यांची भागीदारी 1.5 टक्के आहे. याशिवाय म्युच्युअल फंडस्, एफपीआय आणि सरकारची भागीदारी आहे.
4/6
एलआयसीचं हे पाऊल गुंतवणूकदारांचा विश्वास बळकट करण्यासाठी आणि शेअरची लिक्विडिटी वाढवण्यासाठी टाकण्यात आलं.बाजारात जेव्हा एखाद्या शेअरची किंमत वाढते तेव्हा छोट्या गुंतवणूकदारांना त्याची खरेदी करणं अवघड होतं. बोनस इशू जारी करुन शेअरची किंमत किफायतशीर स्तरावर आणलं जातं. ज्यामुळं त्या शेअरमध्ये ट्रेडिंग वाढते आणि नवे गुंतवणूकदार आकर्षित होतात.
5/6
एलआयसीच्या शेअरवर दबाव पाहायला मिळाला आहे. वर्षभरात शेअरमध्ये 5 टक्के घसरण झाली आहे. डिसेंबर तिमाहीत एलआयसीनं शानदार कामगिरी केली आहे. वार्षिक आधारार नफा 17 टक्के वाढून 12930 कोटींपर्यंत पोहोचला आहे. एलआयसीचा शेअर आज 809 रुपयांवर पोहोचला आहे. एलआयसीच्या शेअरमध्ये 10.65 रुपयांची वाढ झाली आहे.
6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 13 Apr 2026 11:02 PM (IST)