Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून आणखी 40 लाखांहून अधिक महिला अपात्र होणार?; नेमकं कारण काय, पाहा A टू Z माहिती
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै 2024 पासून करण्यात आली आहे. तेव्हापासून लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये दिले जातात.
Ladki Bahin Yojana
1/8
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालवली जाते.
2/8
लाडकी बहीण योजनेतून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची रक्कम दिली जाते. या योजनेचा लाभ योग्य आणि पात्र लाभार्थी महिलांना मिळावा म्हणून सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
3/8
लाडक्या बहिणींना ई- केवायसी करण्यासाठी मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवून देण्यात आली आहे.
4/8
आतापर्यंत 1 कोटी 60 लाख महिलांनी ई केवायसी केली असल्याची माहिती समोर आली आहे.
5/8
अद्याप 30 ते 40 लाख महिलांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाहीय. त्यामुळे 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई केवायसी न केल्यास 40 लाखांहून अधिक महिला योजनेतून अपात्र होतील, अशी माहिती महिला व बाल विकास विभागातील अधिकाऱ्याने दिली आहे.
6/8
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील अपात्र बहिणींचा शोध घेण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
7/8
सद्यस्थितीत 2 कोटी 47 लाख महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळत आहे.
8/8
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै 2024 पासून करण्यात आली आहे. तेव्हापासून लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये दिले जातात.
Published at : 23 Dec 2025 09:24 AM (IST)
= 8">