Stock Market : गुंतवणूकदारांना 'या' शेअरनं 11794 टक्के परतावा दिला, कंपनीनं घेतला मोठा निर्णय
केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीनं बोनस शेअर देण्याचा निर्णय घेतला आहे. एका वर्षात दुसऱ्यांदा एक्स बोनस स्टॉक म्हणून ट्रेड करण्याचा निर्णय घेतलाय. कंपनीनं बोनस शेअर साठी तारीख जाहीर केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबीएसईवर या कंपनीचा शेअर 792 रुपयांवर होता, अप्पर सर्किट लागून शेअर 801.50 रुपयांवर पोहोचला. कंपनीनं 5 रुपयांच्या दर्शनी किंमतीवर 1 नवीन शेअर देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी 3 जानेवारी 2025 ला बोनस शेअर जारी करणार आहे.
केपीआय ग्रीन एनर्जीनं फेब्रुवारीमध्ये देखील बोनस शेअर जारी केले होते. कंपनीचे शेअर ऑगस्टमध्ये स्पिल्ट झाले होते.
केपीआय ग्रीन एनर्जीच्या स्टॉकनं एका वर्षात 67 टक्के परतावा दिला आहे. गेल्या दोन वर्षात केपीआय ग्रीन एनर्जीच्या शेअरमध्ये 418 टक्के वाढ झाली आहे. 5 वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये 11794.50 टक्के वाढ झाली आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)