खऱ्या सोन्याची ओळख कशी कराल? 'या' महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या

सोनं ही केवळ दागिन्यांची सजावट नसून, ती आपल्या सांस्कृतिक आणि आर्थिक गुंतवणुकीचा महत्त्वाचा भाग असते.

Continues below advertisement

सोनं

Continues below advertisement
1/10
सोनं खरेदी करताना अनेकदा आपण फक्त डिझाईन किंवा वजन पाहतो आणि याच ठिकाणी चुका होतात.
2/10
मचं सोनं खरंच दर्जेदार आहे का, हे ठरवण्यासाठी खालील ३ तपशील नेहमी तपासा.
3/10
हॉलमार्क तपासा :(BIS Certification) सोन्याच्या शुद्धतेची खात्री म्हणजे हॉलमार्क.
4/10
भारत सरकारने BIS (Bureau of Indian Standards) सर्टिफाइड दागिन्यांनाच अधिकृत मान्यता दिली आहे. 22k किंवा 18k सोनं घेत असाल, तरी त्यावर हॉलमार्क, कराट मूल्य, आणि ज्वेलरचा कोड असणं आवश्यक आहे. हॉलमार्क नसलेलं सोनं म्हणजे अपूर्ण खात्री!
5/10
बिल आणि घनतेचा तपशील मागा, सोनं खरेदी करताना केवळ मौखिक व्यवहार न करता संपूर्ण बिल घ्या.
Continues below advertisement
6/10
बिलमध्ये दागिन्याचं वजन, सोन्याचा दर, मेकिंग चार्ज आणि जीएसटी याची स्पष्ट माहिती असावी. हे भविष्याच्या विक्रीसाठी किंवा व्यवहारासाठी आवश्यक असतं. घाईत किंवा लग्नसमारंभातही हा तपशील विसरू नका.
7/10
मेकिंग चार्ज (Making Charges) समजून घ्या प्रत्येक दागिन्यावर सोन्याच्या किमतीशिवाय मेकिंग चार्ज जोडले जातात.
8/10
काही ठिकाणी हे 10% तर काही ठिकाणी 25% पर्यंत असतात. म्हणूनच, सोनं खरेदी करताना मेकिंग चार्ज फिक्स आहे की टक्केवारीत, हे नक्की विचारून घ्या. जास्त डिझाइन म्हणजे जास्त मेकिंग चार्ज हे लक्षात ठेवा.
9/10
सोनं खरेदी हा मोठा आणि मौल्यवान निर्णय असतो.
10/10
हॉलमार्क, अधिकृत बिल आणि मेकिंग चार्ज – हे तीन तपशील तपासल्यास तुमचं सोनं सुरक्षित आणि विश्वासार्ह ठरेल.
Sponsored Links by Taboola