Wheat Flour Price Hike : तुमच्या ताटातल्या चपातीची किंमत वर्षात 40 टक्क्यांनी महागली
भारतात गव्हाच्या पिठाची किंमतही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतात गेल्या एका वर्षामध्ये पिठाची किंमत 40 टक्क्यांनी वाढली आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, सुटे पीठ 38 रुपये प्रतिकिलो रुपयाने विकले जात आहे, तर पॅकेजिंगमधील पीठ 45-55 रुपये प्रतिकिलो आहे.
निर्यातीवर बंदी असतानाही गहू आणि पिठाच्या वाढत्या किमतींमुळे केंद्र सरकारवर ताण वाढला आहे.
भारत जगभरात गहू उत्पादनामध्ये दुसऱ्या क्रमांकांवर आहे, असे असले तरी देशात पिठाचा दर वाढत आहे.
गव्हाच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. मैदा आणि रव्याचे भावही झपाट्याने वाढत आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांचे स्वयंपाकघराचे बजेट बिघडले आहे.
उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि बिहार ही प्रमुख गहू उत्पादक राज्ये आहेत, पण हवामान बदलामुळे 2021-22 मध्ये गव्हाचे उत्पादन घटले आहे.
हवामान बदलामुळे गव्हाच्या उत्पादनात घट झाली. त्यामुळे गव्हाचे उत्पादन 129 दशलक्ष टनांवरून 106 दशलक्ष टनांवर आले.
गव्हाच्या सरकारी खरेदीत झालेली घट ही पिठाच्या किमती वाढण्यामागचे दुसरे कारण आहे.
केंद्र सरकारने गव्हासाठी सुमारे 23 रुपये आधारभूत किंमत ठेवली होती, पण व्यापाऱ्यांनी 25-26 रुपये देऊन लोकांकडून गहू खरेदी केला.