PAN Card : पॅन कार्डधारकांनो लक्ष द्या; 'या' नियमांचे उल्लंघन केल्यास 10 हजारांचा होईल दंड
पॅन कार्ड हे सध्या महत्त्वाचे दस्ताऐवज म्हणून ओळखले जाते. बँकिंग आणि इतर आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्ड अनिवार्य असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र, अनेकांना पॅन कार्डचे महत्त्व लक्षात येत नाही.
पॅन कार्डचे महत्त्व प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. त्याच्याशी निगडीत काही बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे.
भारतात एका व्यक्तीच्या नावे एकच पॅन कार्ड जारी केले जाते.
कोणतीही व्यक्ती एकहून अधिक पॅन कार्ड अथवा Duplicate Pan Card बाळगू शकत नाही.
असा गैरप्रकार कोणी केल्याचे आढळल्यास त्या व्यक्तीला दंड भरावा लागू शकतो.
पॅन कार्डमध्ये पॅन क्रमांक आणि कार्डधारकाचे नाव, जन्म तारीख आणि फोटोचा समावेश असतो.
आयकर विभागाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, एक व्यक्ती एकहून अधिक पॅन कार्ड बाळगू शकत नाही.
एखाद्या व्यक्तीला दोन पॅन कार्ड दिले असल्याचे आढळल्यास त्याला आयकर कायदा 1961 च्या कलम 272 नुसार 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.
एखाद्या व्यक्तीकडे एकहून अधिक पॅन कार्ड असतील तर त्याने अतिरिक्त पॅन कार्ड सरेंडर केले पाहिजे. त्यामुळे संभाव्य दंडात्मक कारवाईपासून वाचता येईल.