Investment Tips : ही स्कीम करेल तुम्हाला करोडपती, जाणून घ्या कसे?
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) ही एक बचत योजना आहे. यामध्ये तुम्ही दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास तुमची चांगली सेव्हिंग होईल. विशेष म्हणजे ही रक्कम सुरक्षित राहते. PPF अकाउंट पोस्ट ऑफिस अथवा अधिकृत बँक शाखेतून सुरू करता येईल. सध्या PPF वर दरवर्षी 7.1 टक्के व्याज दर आहे. या खात्याची मुदत ठेव कालावधी 15 वर्षांची असते. याला 5-5 वर्षांच्या कालावधीत वाढवता येऊ शकते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया PPF खात्यात दरवर्षी 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. दरमहा तुम्ही 12 हजार 500 रुपये पीपीएफ खात्यात गुंतवणूक केल्यानंतर 15 वर्षाच्या मॅच्युअरटीनंतर तुम्ही पीपीएफ पाच-पाच वर्षांच्या ब्लॉकमध्ये वाढवू शकता. अशा प्रकारे 25 वर्षानंतर तुमच्या पीपीएफ फंडमध्ये एक कोटी हून अधिक रक्कम जमा होईल.
यामध्ये तुमची गुंतवणूक 37.50 लाख आणि व्याजाची रक्कम जवळपास 65.58 लाख रुपये असेल. यामध्ये व्याज दर दरवर्षी 7.1 टक्के असा गृहीत धरण्यात आला आहे. सरकारकडून तिमाही व्याज दराची समीक्षा केली जाते. अशावेळी मॅच्युअरटी रक्कमेत बदल होऊ शकतो.
या योजनेत आयकर कायद्यातील 80 सी नुसार कर सवलत मिळते. या योजनेत 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर डिडक्शन मिळू शकते. पीपीएफमध्ये मिळालेले व्याजावरील रक्कम आणि मॅच्युअरटी रक्कमेला कर माफी दिली जाते.
पीपीएफ कॅलक्युलेटरनुसार तुम्हाला एक कोटी रुपयांचा निधी जमवण्यासाठी 25 वर्षांचा कालावधी लागेल. त्यासाठी 7.1 टक्के व्याज मिळू शकेल. त्याशिवाय, पीपीएफ गुंतवणुकीतून तुम्हाला करोडपती होण्यास अधिक वेळ लागेल. मात्र, तुमची गुंतवणूक सुरक्षित राहू शकते. म्युच्युअल फंडच्या एसआयपीद्वारे तुम्ही एक कोटींची रक्कम जमवू शकता. मात्र, त्यात बाजाराची जोखीम आहे.